Share Market Opening : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये ?

सोमवारी बीएसईच्या सर्व सेक्टर इंडेक्समध्ये विक्री झाली. बँकिंग, ऑटो आणि रियल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री दिसून आली
Share Market
Share Marketesakal

Share Market Opening : सिलिकॉन व्हॅली बँकेच्या संकटामुळे जागतिक बाजारासह भारतीय बाजारातही घसरण दिसून आली. निफ्टी 5 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स-निफ्टी 1.5 टक्क्यांनी घसरून बंद झाला. सोमवारी बीएसईच्या सर्व सेक्टर इंडेक्समध्ये विक्री झाली. बँकिंग, ऑटो आणि रियल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री दिसून आली.

इन्फ्रा, आयटी आणि एफएमसीजी शेअर्सवरही दबाव होता. मेटल, फार्मा, एनर्जी शेअर्समध्ये विक्री दिसून आली. सेन्सेक्स 897 अंकांनी घसरून 58238 वर बंद झाला आहे. दुसरीकडे, निफ्टी 259 अंकांनी घसरून 17154 च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी बँक 921 अंकांनी घसरून 39565 वर बंद झाला. तर मिडकॅप 611 अंकांनी घसरून 30107 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

बाजाराने आठवड्याची सुरुवात कमजोरीने केल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी घसरले. वाढीसह उघडल्यानंतर, दिवस पुढे जात असताना निफ्टी कमजोर झाला. यूएस बँकिंग संकटामुळे जगभरातील बाजारपेठांवर दबाव आहे. आता निफ्टीला पुढील सपोर्ट 17000 वर दिसत आहे.

Share Market
Share Market Closing : शेअर बाजारात मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी पाण्यात, जाणून घ्या काय झाले?

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते ?

इंडसइंड बँक (INDUSINDBK)

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

टाटा मोटर्स (TATAMOTORS)

महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

ए यू बँक (AUBANK)

भारत फोर्ज (BHARATFORG)

गोजरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

अशोक लेलँड (ASHOKLEY)

एबीबी इंडिया लिमिटेड (ABB)

Share Market
Share Market : अमेरिकेत लागोपाठ दोन बँका बुडाल्यानंतर शेअर बाजारात मोठी घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com