Coal Price Hike : ऐन उन्हाळ्यात वाढणार विजेचे दर? कोल इंडियाने दिले महत्वाचे संकेत |Strong case to hike coal prices, could happen soon says Coal India chairman Agrawal | Electricity Rate Hike | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Strong case to hike coal prices, could happen soon says Coal India chairman Agrawal

Coal Price Hike : ऐन उन्हाळ्यात वाढणार विजेचे दर? कोल इंडियाने दिले महत्वाचे संकेत

Coal Price Hike : या उन्हाळ्यात तुम्हाला वीज बिलासाठी जास्त पैसे द्यावे लागतील कारण लवकरच कोळसा महाग होऊ शकतो. कोल इंडियाने येत्या काही दिवसांत कोळशाच्या किंमतीत वाढ करण्याचे संकेत दिले आहेत.

कोल इंडियाचे चेअरमन प्रमोद अग्रवाल यांनी सांगितले की, कोळशाच्या किंमती वाढवण्याबाबत संकेत मिळत असून लवकरच किंमती वाढवल्या जाऊ शकतात. त्यादृष्टीने संबंधितांशीही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (Strong case to hike coal prices, could happen soon says Coal India chairman Agrawal)

कोल इंडियाचे अध्यक्ष म्हणाले की, कोल इंडियाने गेल्या पाच वर्षांपासून कोळशाच्या किंमती वाढवल्या नाहीत. ते म्हणाले की, यावर्षी कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीबाबतही चर्चा झाली आहे.

यामुळे कोल इंडियाच्या आर्थिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, विशेषत: कोल इंडियाची उपकंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि त्यांचे वेतनखर्च जास्त आहे.

दि टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, प्रमोद अग्रवाल म्हणाले की, कोल इंडियाने कोळशाच्या किंमती वाढवल्या नाही तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यांनी सांगितले की 2025-26 पर्यंत एक अब्ज टन कोळशाच्या उत्पादनाचे लक्ष्य निश्चितपणे गाठले गेले आहे.

कोल इंडियासाठी यंदा कोळशाच्या किंमतीत वाढ करणे इतके सोपे नसले तरी. पुढील वर्षी 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.

कोळशाच्या किंमतीत वाढ झाली म्हणजे ऊर्जा, सिमेंटसह अनेक उद्योगांच्या किंमतीवर या निर्णयाचा परिणाम होणार असून, त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत केंद्र सरकार कोळशाच्या किंमती वाढवण्यास हिरवा कंदील देते का, याबाबत साशंकता आहे.

दुसरीकडे, स्टॉक एक्स्चेंजमध्ये मोठी घसरण होऊनही कोल इंडियाच्या शेअरमध्ये 2.39 टक्क्यांची थोडीशी घसरण झाली आहे. कोल इंडियाचा शेअर 5.35 रुपयांनी कमी होऊन स्टॉक एक्स्चेंजवर 216.35 रुपयांवर व्यवहार करत आहे.