Tata Group: अंबानी, अदानींना मागे टाकत टाटा बनले नंबर वन, जगातील टॉप 20 कंपन्यांमध्ये मिळाले स्थान |Tata Group ranked 20th in BCG list of 50 top innovative companies 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratan Tata

Tata Group: अंबानी, अदानींना मागे टाकत टाटा बनले नंबर वन, जगातील टॉप 20 कंपन्यांमध्ये मिळाले स्थान

Tata Group: जगातील टॉप-50 सर्वात नाविन्यपूर्ण कंपन्यांच्या यादीत टाटा समूहाच्या नावाचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे या यादीत ही एकमेव भारतीय कंपनी आहे.

बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपची सर्वाधिक नाविन्यपूर्ण कंपन्यांची 2023 यादी बुधवारी प्रसिद्ध झाली. यामध्ये टाटा समूह 20 व्या क्रमांकावर आहे.

ही यादी दरवर्षी बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपद्वारे प्रसिद्ध केली जाते. यामध्ये जगभरातील कंपन्यांची कामगिरी, त्यांची क्षमता आणि नाविन्य यासह इतर अनेक बाबी तपासल्या जातात आणि या आधारावर त्यांना यादीत स्थान दिले जाते.

देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक घराण्यांपैकी एक असलेल्या टाटा समूहाने या सर्व बाबींवर चांगली कामगिरी करून हे स्थान प्राप्त केले आहे.

टॉप-3 रँकिंगमध्ये या कंपन्यांची नावे:

आयफोन बनवणारी अमेरिकन कंपनी Apple टॉप-50 मोस्ट इनोव्हेटिव्ह कंपन्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. जगातील दुसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाला स्थान देण्यात आले आहे.

यादीत तिसऱ्या क्रमांकावर अॅमेझॉन आहे, ज्याचे नेतृत्व जेफ बेझोस करत आहेत, गेल्या वर्षी जाहीर झालेल्या यादीत टेस्ला तिसऱ्या क्रमांकावर होती, आता कंपनीच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे.

'या' कंपन्यांनाही मिळाले स्थान:

यादीत समाविष्ट असलेल्या इतर मोठ्या कंपन्यांमध्ये Google ची मूळ कंपनी अल्फाबेट चौथ्या क्रमांकावर आहे, तर अब्जाधीश बिल गेट्सची मायक्रोसॉफ्ट पाचव्या क्रमांकावर आहे.

अमेरिकन फार्मा कंपनी मॉडर्ना सहाव्या, दक्षिण कोरियाची सॅमसंग सातव्या, चिनी कंपनी हुआवे आठव्या क्रमांकावर आहे. बीवायडी कंपनीला नवव्या क्रमांकावर तर सीमेन्सला दहाव्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे.

मोस्ट इनोव्हेटिव्ह कंपन्यांच्या 2023 च्या यादीत समाविष्ट असलेल्या इतर कंपन्यांमध्ये फार्मा कंपनी फायझर, स्पेसएक्स, फेसबुक (मेटा), नेस्ले, वॉलमार्ट, अलीबाबा आणि इतर कंपन्यांना त्यात स्थान देण्यात आले आहे.

स्वातंत्र्यापूर्वी सुरू झालेल्या कंपन्यांमध्ये टाटा समूहाचे नाव अग्रस्थानी येते. मीठापासून ते आलिशान गाड्या बनवणाऱ्या या समूहाचा व्यवसाय 1868 मध्ये सुरू झाला.

आज आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी TCS, मेटल क्षेत्रातील टाटा स्टील, टाटा मोटर्ससह इंडियन हॉटेल कंपनी या समूहाचा भाग आहेत.