
Tech Layoff 2023 : गुगल इंडियाचा कर्मचाऱ्यांना मोठा धक्का! एका दिवसात तब्बल 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना बसवले घरी
Google India Layoff 2023 : गुगलने गुरुवारी रात्री उशिरा भारतातील विविध विभागांतील 453 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गुगल इंडियाचे उपाध्यक्ष संजय गुप्ता यांनी कर्मचाऱ्यांना मेल पाठवला होता. Google India कडून टिप्पण्या मागणाऱ्या प्रश्नांसह पाठवलेल्या ईमेलला कोणतेही उत्तर मिळाले नाही.
गेल्या महिन्यात, अल्फाबेट इंक, Google च्या मूळ कंपनीने, 12,000 कर्मचार्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी कर्मचार्यांना मेल पाठवून सांगितले होते की, "कर्मचाऱ्यांच्या कपातीबाबतच्या निर्णयाची पूर्ण जबाबदारी आम्ही घेत आहोत.
आम्ही प्रभावित झालेल्या यूएसमधील कर्मचाऱ्यांना आधीच एक वेगळा ईमेल पाठवला आहे. इतर देशांमध्ये, स्थानिक कायदे आणि पद्धतींमुळे या प्रक्रियेला जास्त वेळ लागेल,”
जानेवारीच्या सुरुवातीला मायक्रोसॉफ्टने 10,000 नोकऱ्या कपातीची घोषणा केली होती Amazon देखील 18,000 कर्मचाऱ्यांना कमी करत आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटाने असेही म्हटले आहे की, ते जगभरातील 11,000 कर्मचाऱ्यांना कमी करत आहेत.
याहूनेही 1600 लोकांना कामावरून काढून टाकले :
मोठी टेक कंपनी याहूनेही आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कंपनीने 1600 लोकांना कामावरून काढले आहे.
कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या हे प्रमाण 20 टक्के आहे. यापूर्वी, डिस्नी या मोठ्या मनोरंजन कंपनीनेही आपल्या 7,000 कर्मचार्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. कंपनीला होत असलेल्या तोट्यामुळे कंपनीचे सीईओ बॉब इगर यांनी हा निर्णय घेतला.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात :
अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. गेल्या आठवड्यात टेक कंपनी झूमने 1300 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. डेलने आपल्या सहा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती.