UPI Payment Charges : 1 एप्रिलपासून UPI ​​व्यवहार महागणार! पेमेंटवर आता अतिरिक्त शुल्क भरावे लागणार | UPI Merchant Transactions | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UPI Payment Charges

UPI Payment Charges : 1 एप्रिलपासून UPI ​​व्यवहार महागणार! पेमेंटवर आता अतिरिक्त शुल्क भरावे लागणार

UPI Payment : तुम्हीही अनेकदा गुगल पे किंवा पेटीएमने पेमेंट करत असाल तर ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसेल. होय, 1 एप्रिल 2023 पासून UPI ​​व्यवहार महाग होणार आहेत. युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) पेमेंटशी संबंधित एक परिपत्रक नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने जारी केले आहे.

यामध्ये 1 एप्रिलपासून यूपीआयद्वारे व्यापारी व्यवहारांवर 'प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI)' शुल्क लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या बदलाचा परिणाम करोडो लोकांना होणार आहे. असे वृत्त मिंटने दिले आहे. (UPI merchant transactions over Rs 2,000 to carry charge of 1.1% from Apr 1)

NPCI ने जारी केलेल्या परिपत्रकात 1 एप्रिलपासून 2,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर 1.1 टक्के अधिभार लावण्याची सूचना केली आहे. हे शुल्क व्यापाऱ्यांच्या व्यवहाराला म्हणजेच व्यापाऱ्यांना पैसे देणाऱ्या ग्राहकांना द्यावे लागेल.

वॉलेट किंवा कार्डद्वारे केलेले व्यवहार पीपीआयमध्ये येतात. इंटरचेंज फी सहसा कार्ड पेमेंटशी संबंधित असते. व्यवहार स्वीकारण्यासाठी आणि खर्च कव्हर करण्यासाठी शुल्क आकारले जाते.

डिजिटल पद्धतीने पेमेंट करणे महाग होणार :

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन (NPCI) कडून असे सांगण्यात आले की 30 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी त्याचा निर्णय निश्चित केला जाईल.

NPCI च्या परिपत्रकानुसार, 1 एप्रिलपासून, Google Pay, Phone Pay आणि Paytm सारख्या डिजिटल मोडद्वारे पेमेंट करणे महाग होईल. जर तुम्ही 2,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहार केला तर तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील.

अहवालात असे समोर आले आहे की UPI व्यवहारांपैकी 70 टक्के व्यवहार 2,000 रुपयांपेक्षा जास्त आहेत. NPCI च्या परिपत्रकात असे म्हटले आहे की 1 एप्रिलपासून नियम लागू झाल्यानंतर 30 सप्टेंबर 2023 पूर्वी त्याची तपासणी केली जाईल.