Notes 2000 | २ हजार रुपयांच्या नोटा छापण्यासाठी किती खर्च येतो ? what is the cost of printing note of rupees 2000 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Notes 2000

Notes 2000 : २ हजार रुपयांच्या नोटा छापण्यासाठी किती खर्च येतो ?

मुंबई : अशाच एके रात्री अख्ख्या देशाला पळापळ करायला लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ हजार आणि ५०० रुपयांच्या जुन्या नोटा क्षणार्धात बाद ठरवल्या होत्या. त्याचीच परिणती म्हणून देशात २ हजार रुपयांच्या गुलाबी नोटांचा जन्म झाला.

चलनात येऊन १० वर्षंही होत नाहीत तोवर २ हजार रुपयांच्या नोटा कालबाह्य होऊ घातल्या आहेत. सध्या चलनात असलेल्या २ हजारच्या नोटा वापरता येणार असल्या तरी त्यांची छपाई बंद करण्यात आली आहे.

पण तुम्हाला माहितीये का या नोटांच्या छपाईसाठी किती खर्च येत होता ? (what is the cost of printing note of rupees 2000)

गेल्या काही वर्षांत कागद आणि छपाईचा खर्च वाढल्याने नोटांच्या छपाईचा खर्च वाढला आहे. २०२०-२१ या वर्षात ५० रुपयांच्या हजार नोटांचा खर्च ९२० रुपये होता. पुढील वर्षात तो २३ टक्क्यांनी वाढून १ हजार १३० रुपये झाला. सर्वाधिक खर्च २०० रुपयांची नोट छापण्यासाठी येतो.

नोटा छापण्यापेक्षा नाणी बनवणे अधिक महागडे आहे. काही नाण्यांचा खर्च त्यांच्या मूल्यापेक्षा अधिक असतो.

प्रत्येक नोट छापण्याचा खर्च वेगवेगळा असतो. २ हजार रुपयांची एक नोट छापायला ४ रुपये खर्च येतो. हा खर्च २०१८मध्ये ४.१८ रुपये, २०१९मध्ये ३.५३ रुपये होता.

१० रुपयांच्या हजार नोटांची छपाई करण्यासाठी ९६० रुपये खर्च येतो. म्हणजेच प्रत्येक नोट छापण्यासाठी १ रुपयापेक्षा कमी खर्च येतो. १०० रुपयांच्या हजार नोटांसाठी १७७० रुपये खर्च येतो.

२००च्या हजार नोटांसाठी २३७० रुपये आणि ५००च्या हजार नोटा छापण्यासाठी २२९० रुपये खर्च येतो.

टॅग्स :moneyfake note