Mutual Fund: म्युच्युअल फंडमधून करोडपती होण्यासाठी किमान किती गुंतवणूक करावी? जाणून घ्या एका क्लिकवर|What is the minimum investment required to become a millionaire in mutual funds? Know in details | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mutual Fund

Mutual Fund: म्युच्युअल फंडमधून करोडपती होण्यासाठी किमान किती गुंतवणूक करावी? जाणून घ्या एका क्लिकवर

Mutual Fund Investment Plans: तुम्ही म्युच्युअल फंड योजनेमध्ये गुंतवणूक करून करोडपती बनण्याचे स्वप्न पाहत आहात का? हे खरच शक्य आहे का? तर हो अगदी शक्य आहे. पण यामध्ये थोडा वेळ लागू शकतो.

म्युच्युअल फंडात पैसे गुंतवल्यानंतर तुम्हाला थोडी वाट पहावी लागेल. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल की करोडपती होण्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडात किती गुंतवणूक करावी लागेल?

आपल्याकडे करोडो रुपये असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते, परंतु बहुतेक लोकांना हे समजत नाही की करोडपती होण्यासाठी म्युच्युअल फंडात किती पैसे आणि किती काळ गुंतवणूक करावी? तुमचाही असाच गोंधळ असेल तर समजून घेऊ.

एकरकमी पैसे खर्च करावे लागतील:

वयाच्या 20 व्या वर्षी एखाद्याने म्युच्युअल फंड योजनेत एक लाख रुपये गुंतवले तरी हे पैसे त्याला करोडपती बनवू शकतात. 20 व्या वर्षी गुंतवलेले 1 लाख रुपये 12% परतावा देत असल्यास, तो वयाच्या 60 व्या वर्षी 1 कोटी रुपयांचा मालक होईल.

म्युच्युअल फंड योजना 12% परतावा देऊ शकते. बाजारात अशा अनेक म्युच्युअल फंड योजना उपलब्ध आहेत ज्या 12% पेक्षा जास्त परतावा देतात.

मासिक गुंतवणूक इतकी करावी लागेल?

जर तुम्हाला 1 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी दर महिन्याला गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत सतत दरमहा 750 रुपये गुंतवून करोडपती होऊ शकता.

जर तुम्हाला म्युच्युअल फंडांवर 10% परतावा मिळाला तर वयाच्या 60 व्या वर्षी सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी तयार होईल. दुसरीकडे, जर तुम्हाला 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर फक्त 8% परतावा मिळत असेल, तर वयाच्या 60 व्या वर्षी करोडपती होण्यासाठी तुम्हाला दरमहा सुमारे 2200 रुपये गुंतवावे लागतील.

सर्वाधिक परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड योजना:

देशातील सर्वोच्च म्युच्युअल फंड योजना क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना मागील 5 वर्षांपासून सतत दरवर्षी 24.08 टक्के परतावा देत आहे. ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी म्युच्युअल फंड योजना गेल्या 5 वर्षांपासून दरवर्षी 21.14% परतावा देत आहे.

त्याचप्रमाणे, एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज म्युच्युअल फंड योजना देखील गेल्या 5 वर्षांपासून सतत 20.85% परतावा देत आहे.

दुसरीकडे, आदित्य बिर्ला सन लाइफ डिजिटल इंडिया म्युच्युअल फंड योजना देखील 5 वर्षांसाठी दरवर्षी 20.67% सतत परतावा देत आहे. गुंतवणुकीसाठी तुम्ही अशी कोणतीही योजना निवडू शकता.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :Mutual FundInvestment