Ankiti Bose: झिलिंगोच्या माजी CEO अंकिती बोस यांनी मूर्तीं विरोधात 820 कोटींचा मानहानीचा खटला केला दाखल|Zilingo cofounder Ankiti Bose files Rs 820 crore defamation suit against investor Mahesh Murthy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ankiti Bose

Ankiti Bose: झिलिंगोच्या माजी CEO अंकिती बोस यांनी मूर्तीं विरोधात 820 कोटींचा मानहानीचा खटला केला दाखल

Ankiti Bose Vs Mahesh Murthy: सिंगापूरस्थित फॅशन कंपनी झिलिंगोच्या सह-संस्थापक आणि माजी सीईओ अंकिती बोस यांनी सुप्रसिद्ध गुंतवणूकदार आणि सीडफंड कंपनीचे सह-संस्थापक महेश मूर्ती यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे.

अंकिती बोसने मुंबई उच्च न्यायालयात महेश मूर्ती विरुद्ध 100 दशलक्ष डॉलर (रु. 820 कोटींहून अधिक) मानहानीचा खटला दाखल केला आहे. आउटलुक बिझनेस मासिकाच्या 1 मार्चच्या अंकात महेश मूर्ती यांचा एक लेख प्रसिद्ध झाला होता.

ज्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. आपल्या लेखात मूर्ती यांनी अंकिती बोसवर एका स्टार्टअपकडून अवैध पैसे घेतल्याचा अप्रत्यक्षपणे आरोप केला होता. (Ankiti Bose Files Defamation Against Mahesh Murthy)

महेश मूर्तींच्या कोणत्या आरोपांमुळे प्रकरण घडलं?

अंकिती बोसला एप्रिल 2022 पासून झिलिंगोमधून निलंबित करण्यात आले. कंपनीत अयोग्य वर्तन केल्याच्या तक्रारी तीच्यावर करण्यात आल्या होत्या.

हिंदुस्थान टाईम्स मीडियाच्या वृत्तानुसार, मूर्ती यांनी लेखात बोसचे नाव घेतले नसले तरी, मूर्ती यांनी लेखात स्टार्टअप्सकडून अवैध पैसे घेणाऱ्या संस्थापकांचा उल्लेख करताना 'एक महिला' असा उल्लेख करण्यात आला आहे. जिने एक लोकप्रिय फॅशन पोर्टल चालवले आणि सेक्वोया कंपनीकडून पैसे घेतले.

मूर्ती यांनी आरोप केला आहे की तिने (महिलेने) तिच्या फर्मच्या वकिलाला फी म्हणून 70 कोटी रुपये देण्यास सांगितले.

काय म्हणाल्या अंकिती बोस?

अंकिती बोस म्हणाल्या, “खरं म्हणजे माझ्यासमोर कोणताही पुरावा सादर करण्यात आला नाही, माझ्यासमोर कोणताही अहवाल ठेवण्यात आला नाही.

केवळ मीडियाची बरीच विधाने होती आणि अनेक स्रोत गोष्टी सांगत होते पण रेकॉर्डवर कोणीही थेट काहीही बोलत नव्हते." अंकिती बोस यांनी 20 एप्रिल रोजी मूर्ती विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.