
दिलीप घाटे
dilipghate2@gmail.com
रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (आरएलएलआर) म्हणजे काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत असतो. रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट हा व्याजदर आहे; ज्यावर बँका आरबीआयने निश्चित केलेल्या रेपो दरावर आधारित ग्राहकांना कर्ज देतात. ‘रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट’ हा शब्द रेपो दराशी जोडलेल्या व्याजदरांचा संदर्भ देतो.
ऑक्टोबर २०१९ मध्ये जारी केलेल्या आरबीआयच्या परिपत्राकानुसार बँकांनी त्यांचे किरकोळ कर्ज बाह्य बेंचमार्क कर्जदारांशी जोडले पाहिजेत, ज्याला ई-बीएलआर म्हणतात. परिणामी, रेपो दर बहुतेक बँकांसाठी बेंचमार्क बनला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने सात फेब्रुवारी २०२५ रोजी रेपोदरामध्ये पाव टक्क्याने कपात केली आणि लगेच दोन महिन्यांमध्ये पुन्हा नऊ एप्रिल २०२५ रोजी आणखी पाव टक्क्याने कपात केली. ज्या कर्जदारांची कर्जे रेपो-लिंक्ड रेटशी निगडीत आहेत अशांनी जागरूक राहून रेपो रेट कपात झाल्यावर आपल्या फायद्याचा योग्य निर्णय घ्यावा व आपल्या बँकेला तसे लेखी कळवावे; जेणेकरून व्याज-खर्चात बचत होईल.