Adani Group: गौतम अदानी नवीन प्रोजेक्टसाठी घेणार 65,41,37,20,800 रुपयांचे कर्ज; 'या' बँका करणार मदत |Adani group aims to raise about 800 million Doller for financing green energy projects | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam Adani

Adani Group: गौतम अदानी नवीन प्रोजेक्टसाठी घेणार 65,41,37,20,800 रुपयांचे कर्ज; 'या' बँका करणार मदत

Adani Group: शेअर्सच्या किंमतीत झालेल्या रिकव्हरीमुळे कर्ज देणाऱ्या बँकांची संख्या 18 वरून 25 झाली आहे. गुरुवारी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

अदानी समूह आपल्या न्यू ग्रीन एनर्जी प्रोजेक्टसाठी सुमारे 800 दशलक्ष डॉलर (सुमारे 6500 कोटी रुपये) उभारण्याची योजना आखत आहे.

हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाचे हे सर्वात मोठे कर्ज असू शकते. या कर्जासाठी गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूह अनेक बँकांशी बोलणी करत आहे.

'या' बँकांशी चर्चा सुरू

अदानी समूह न्यू ग्रीन एनर्जी प्रोजेक्टसाठी हे कर्ज घेत आहे. या कर्जासाठी समूह जगातील आघाडीच्या बँकांशी चर्चा करत आहे.

या बँकांमध्ये डीबीएस बँक लिमिटेड, सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन, मित्सुबिशी यूएफजे फायनान्शियल ग्रुप आणि स्टँडर्ड चार्टर्ड यांचा समावेश आहे.

हे कर्ज 700 ते 800 दशलक्ष डॉलर्सचे असू शकते. मात्र, कर्जाची किंमत अद्याप निश्चित झालेला नाही. ते कमी किंवा जास्त असू शकते. अशी माहिती ब्लूमबर्गने दिली आहे.

हिंडेनबर्ग अहवालामुळे सुमारे 100 अब्ज डॉलरचे नुकसान झाले:

24 जानेवारी रोजी अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाविषयी एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स 80 टक्क्यांनी घसरले होते.

समूहाच्या कंपन्यांचे बाजारमूल्य सुमारे 100 अब्ज डॉलरनी घसरले होते. मात्र, आता त्यांच्यात काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. अदानी समूहाने हिंडेनबर्गचे आरोप वारंवार फेटाळले आहेत.

अदानी समूहाच्या शेअर्सची स्थिती:

गुरुवारी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 0.25 टक्क्यांनी वाढून 1852.65 रुपयांवर बंद झाला. अदानी पोर्टचा शेअर 0.74 टक्क्यांनी घसरून 659.75 रुपयांवर बंद झाला. अदानी पॉवरचा शेअर 1.47 टक्क्यांनी घसरून 214.15 रुपयांवर बंद झाला.

अदानी ट्रान्समिशनचा शेअर 0.57 टक्क्यांनी घसरून 981.65 रुपयांवर बंद झाला. अदानी ग्रीनचा शेअर 0.83 टक्क्यांनी घसरून 916.95 रुपयांवर बंद झाला.

अदानी टोटलचा शेअर 0.44 टक्क्यांनी घसरून 916.20 रुपयांवर बंद झाला. अदानी विल्मरचा शेअर 0.22 टक्क्यांनी घसरून 402.20 वर बंद झाला.