Vivek Agnihotri : खबरदार मोदींबद्दल कुणी बोललं तर...अग्निहोत्रींचा संताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vivek Agnihotri

Vivek Agnihotri : खबरदार मोदींबद्दल कुणी बोललं तर...अग्निहोत्रींचा संताप

Vivek Agnihotri On George Soros : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांना "वृद्ध, श्रीमंत, मतप्रिय आणि धोकादायक व्यक्ती" असे संबोधल्यानंतर, चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी सोरोस यांना "हिंदूफोबिक" म्हटले आहे.

92 वर्षीय अब्जाधीश सोरोस यांच्यावर एस जयशंकर यांनी केलेल्या टिपण्णीचा व्हिडिओ शेअर करत अग्निहोत्री यांनी ट्विटरवर लिहिले की, “जॉर्ज सोरोस एक वृद्ध, श्रीमंत आणि धोकादायक व्यक्ती आहेत.’ आणि हिंदुफोबिक आहे. सर" सध्या सुरू असलेल्या अदानी-हिंडेनबर्ग वादावर सोरोस राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी आहेत.

जॉर्ज सोरोस यांनी नरेंद्र मोदी यांना म्हणाले होते की, "उद्योजक गौतम अदाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवळचे सहकारी आहेत. त्यांचे भाग्य एकमेकांशी जोडलेले आहे."

जॉर्ज सोरोस यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्या नंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी याला भारताच्या लोकशाहीवर हल्ला म्हणून संबोधले, त्यांच्या या टिप्पण्यांवर भाजप नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, ''बँक ऑफ इंग्लंड फोडणारा आणि आर्थिक युद्ध गुन्हेगार असलेल्या माणसाने आता भारतीय लोकशाही तोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.''

या नंतर त्या म्हणाल्या की, “सोरोसला पाठिंबा देणाऱ्यांना हे माहित असणे आवश्यक आहे की भारतात लोकशाही आहे आणि पुढेही राहील.''

जयशंकर यांनी नक्की काय म्हटलंय?

मी सोरोस यांना केवळ वृद्ध, श्रीमंत आणि आपली भूमिका मांडणारे असं म्हणून थांबू शकतो. पण ते जेष्ठ, श्रीमंत आणि मतं मांडण्याबरोबरच एक खतरनाक व्यक्तीही आहेत. जेव्हा असे लोक विशिष्ट विचार माडंतात तेव्हा ते स्वतःची एक काल्पनिक कथा सांगण्याचा प्रयत्न करत असतात.

सोरेस यांसारख्या लोकांना वाटतं की, निवडणुका तेव्हाच चांगल्या असतात जेव्हा त्यांच्या आवडत्या व्यक्ती जिंकतात. पण जर निवडणुकीचा परिणाम काही वेगळाच आला तर ते त्या देशाच्या लोकशाहीत त्रृटी असल्याचं म्हणतात.