
Share Market Investment Tips: कालच्या तेजीनंतर आज शेअर बाजारात कोणते 10 शेअर्स असतील अॅक्शनमध्ये?
Share Market Investment Tips: मंगळवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्स दिवसभराच्या अस्थिरतेनंतर काहीशा वाढीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 18.11 अंकांनी अर्थात 0.03 टक्क्यांनी वाढून 61981.79 वर बंद झाला आणि निफ्टी 33.60 अंकांनी म्हणजेच 0.18 टक्क्यांनी वाढून 18348 वर बंद झाला.
आज कशी असेल बाजाराची स्थिती?
दिवसभराच्या व्यवहारात निफ्टी इंडेक्स 18400 च्या आसपास फिरताना दिसल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. चढ-उतारानंतरही बाजाराचा कल तेजीचा राहिला.
निफ्टी 18300 च्या सपोर्टच्या वर राहण्यात यशस्वी झाला. पण आता निफ्टीला 18500 वर रझिस्टंस दिसत आहे. जर निफ्टीने हा रझिस्टंस पार केला, तर त्यात 18800 पर्यंत आणखी तेजी पाहू शकतो.
मंगळवारी वरील स्तरावर प्रॉफीट बुकिंग दिसून आल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. निफ्टीने दिवसाचा शेवट 34 अंकांच्या वाढीसह केला.
काही आयटी शेअर्समध्येही प्रॉफीट बुकींग दिसून आली. मेटल इंडेक्सवेने इतर सर्व सेक्टर्सना मागे टाकले आणि सुमारे 2.5 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.
तांत्रिकदृष्ट्या विचार केल्यास निफ्टीने डेली चार्टवर हॅमर कँडलस्टिक रिव्हर्सल कॉन्फिगरेशन तयार केले आहे. हे बाजारातील क्षणिक कमजोरीच्या शक्यतेचे संकेत आहे.
शॉर्ट टर्ममध्ये बाजाराची दिशा स्पष्ट होत नाही. 18300 हा ट्रेडर्ससाठी महत्त्वाचा सपोर्ट आहे. जर निफ्टीने हा सपोर्ट कायम राखला तर तो पुढे 18450-18500 ची पातळी गाठू शकेल. तर निफ्टी 18300 च्या खाली घसरला तर 18200-18175 वर जाताना दिसू शकतो.
आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?
अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)
डिव्हीस लॅब (DIVISLAB)
बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)
आयशर मोटर्स (EICHERMOT)
युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)
बंधन बँक (BANDHANBNK)
बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)
श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)
भारतीय कंटेनर निगम (CONCOR)
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.