Share Market Investment Tips: कालच्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात कोणते 10 शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये?|After yesterday's decline, which 10 stocks will be in action in the stock market today | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Investment Tips: कालच्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात कोणते 10 शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये?

Share Market Investment Tips: बुधवारी शेअर बाजारात सलग तीन दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला आणि बाजार लाल रंगात बंद झाला.

व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 208.01 अंकांनी अर्थात 0.34 टक्क्यांनी घसरून 61773.78 वर बंद झाला, तर निफ्टी 62.60 अंकांनी म्हणजेच 0.34 टक्क्यांनी घसरून 18,28540 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी कमजोरीसह उघडला आणि दिवसभरात बरीच अस्थिरता दिसून आल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले. व्यवहाराच्या शेवटी निफ्टी 60 अंकांनी घसरून बंद झाला.

डेली चार्टवर, निफ्टी गेल्या काही आठवड्यांपासून 18400 - 18000 च्या रेंजमध्ये व्यवहार करत आहे. 20-दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजवर सपोर्ट घेतल्यानंतर आलेला पुलबॅक 18400 च्या आसपास तुटला. तरीही मोमेंटम इंडिकेटरमध्ये नकारात्मक क्रॉसओव्हर देत आहे.

निफ्टीची किंमत आणि मोमेंटम इंडिकेटर सध्या वेगवेगळ्या दिशेने आहेत. यामुळे एत्या काळात निफ्टीमध्ये कंसोलिडेशन दिसू शकते.

एकूणच निफ्टी अजूनही कंसोलिडेशनच्या स्थितीत असल्याचे दिसते. कंसोलिडेशनची ही रेंज 18000–18400 वर असू शकते. निफ्टीसाठी 18420-18450 वर रझिस्टंस दिसत आहे. तर 18200 - 18150 वर सपोर्ट आहे.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • एचडीएफसी बँक (HDFCBANK)

  • आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • झिंदाल स्टील (JINDALSTEL)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.