
NBCC Shares मध्ये तेजी, नव्या ऑर्डरमुळे होतेय वाढ...
NBCC Shares : सरकारी कंपनी नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनच्या (NBCC) शेअर्समध्ये शुक्रवारी चांगली तेजी पाहायला मिळाली. सध्या, शेअर बाजारात घसरण होत असतानाही हा शेअर सुमारे 2 टक्क्यांच्या वाढीसह 37.80 रुपयांवर पोहोचला. तर इंट्राडेमध्ये 38.55 रुपयांवर पोहोचला.
कंपनीला नुकतीच 230 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. यामुळेच शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. (As NBCC Shares are in growth new order increased read story)
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडकडून कंपनीला 229.81 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. काकीनाडा इथे आयआयएफटीसाठी एनबीएफसी नवीन कॅम्पस तयार करणार असल्याे कंपनीने सांगितले. याआधी, फर्मला हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीरसह ओडिशामध्ये 541.02 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स मिळाल्या होत्या.
24 फेब्रुवारीपर्यंत कंपनीची कंसोलिडेटेड ऑर्डर बुक 54,600 कोटी होती. एनबीएफसीने जानेवारीमध्ये एकूण 194.17 कोटींचा व्यवसाय केला आहे, जो एका महिन्यापूर्वी 309.10 कोटी आणि नोव्हेंबरमध्ये 300.41 कोटी होता. डिसेंबर 2022 मध्ये त्याची कंसोलिडेटेड नेट सेल 6 टक्क्यांनी वाढून 2,135.78 कोटी रुपये झाली, तर नेट प्रॉफिट जवळपास 17 टक्क्यांनी घसरून 69.09 कोटी झाला.
एनबीएफसीच्या शेअर्सने गेल्या काही वर्षांत उत्कृष्ट परतावा दिला आहे. गेल्या 5 दिवसांत त्याचे शेअर्स सुमारे 6 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याच वेळी, गेल्या एका महिन्यात सुमारे 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पण गेल्या वर्षभरात त्यात 4 टक्क्यांनी घट झाली आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.