
Multibagger Stock Tips: 'या' बँकेच्या शेअर्समध्ये 4% वाढ, बिझनेस ग्रोथ अपडेटनंतर वाढले शेअर्स
Multibagger Stock Tips: सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाच्या (Bank of Baroda) शेअर्समध्ये मंगळवारी 4 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. पण शेवटी 2.77 टक्क्यांनी वाढून 170.80 रुपयांवर बंद झाला.
त्यांच्या एकूण व्यवसायाने आर्थिक वर्ष 2023 च्या मार्च तिमाहीत 21 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्याचे बँकेने म्हटले आहे. त्यानंतर बँकेच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.
बँक ऑफ बडोदाने आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीसाठी बिझनेस अपडेट जारी केले आहे. मार्च तिमाहीत बँकेचा व्यवसाय 16.8 टक्क्यांनी वाढून 21,77,307 कोटी झाला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत हा आकडा 18,64,059 कोटी होता.
एकूण बँक ठेवी 10.45 लाख कोटींवरून 15.1 टक्क्यांनी वाढून 12.04 लाख कोटी रुपयांवर गेल्या आहेत, तर देशांतर्गत ठेवी 13 टक्क्यांनी वाढून 9.27 लाख कोटी रुपयांवरून 10.47 लाख कोटी रुपये झाल्या आहेत.
बँकेची ग्लोबल ग्रॉस ऍडव्हांस 8.18 लाख कोटींवरून 19 टक्क्यांनी वाढून 9.7 लाख कोटी रुपये आणि डोमेस्टिक ग्रॉस ऍडव्हांस 6.84 लाख कोटींवरून 16.9 टक्क्यांनी वाढून 7.99 लाख कोटी रुपये झाला.
बँकेने ऍडव्हान्स आणि ठेवी दोन्हीमध्ये वाढीसह मजबूत व्यवसाय वाढ नोंदवल्याचे मोतीलाल ओसवालने म्हटले आहे. ब्रोकरेज फर्मने स्टॉकवर आपले बाय रेटिंग कायम ठेवले आहे.
ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने स्टॉकला 'ओव्हरवेट' रेटिंग दिले आहे आणि टारगेट 220 रुपये आहे. याशिवाय मॉर्गन स्टॅन्लेने 220 रुपयांच्या टारगेटसह स्टॉकला 'ओव्हरवेट' रेटिंग दिले आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.