Adani Group: गौतम अदानींची साडेसाती संपेना, सात कंपन्यांना 3,800 कोटींचे नुकसान, काय आहे कारण?|Big blow to Gautam Adani, loss of 3,800 crores to seven companies, what is the reason | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adani Group

Adani Group: गौतम अदानींची साडेसाती संपेना, सात कंपन्यांना 3,800 कोटींचे नुकसान, काय आहे कारण?

Adani Group: मे महिन्याची सुरुवात देशांतर्गत शेअर बाजारासाठी किंवा अदानी समूहासाठी चांगली राहिलेली नाही. महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात, दोन्ही प्रमुख देशांतर्गत शेअर निर्देशांक निफ्टी (NSE Nifty50) आणि सेन्सेक्स (BSE सेन्सेक्स) दबावाखाली राहिले, तर अदानी समूहाच्या कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले.

गेल्या आठवड्यात, शेवटच्या दिवशी म्हणजे 5 मे रोजी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. शेवटच्या दिवशी सेन्सेक्स सुमारे 700 अंकांनी घसरला, तर निफ्टी देखील सुमारे 1.15 टक्क्यांनी घसरला. आठवड्याच्या इतर दिवसांच्या तुलनेत सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली.

अनेक कंपन्यांचे निकाल जाहीर

अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर या आठवड्यात 0.2 टक्क्यांनी घसरला. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या किंमती जवळपास स्थिर आहेत.

अदानी ग्रीन एनर्जी 1 टक्क्यांहून अधिक घसरला, तर अदानी ट्रान्समिशनमध्ये सुमारे 3 टक्क्यांनी घसरण झाली. आठवडाभरात, अदानी समूहाच्या कंपन्यांनी मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले, त्यामध्ये मोठी घसरण झाल्याचे दिसून आली.

'या' कंपन्यांचे मार्केट कॅप कमी झाले:

गेल्या आठड्यात, किंमतीतील अस्थिरतेमुळे अदानी समूहाच्या 10 पैकी 7 सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात 3,782 कोटी रुपयांची घसरण झाली.

बाजार भांडवलाच्या संदर्भात नुकसान झालेल्या कंपन्यांमध्ये अदानी एंटरप्रायझेस, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस आणि अदानी विल्मार यांचा समावेश होता. त्यांचे बाजार भांडवल रु. 507 कोटी ते रु. 2,856 कोटींच्या दरम्यान घसरले.

'या' कंपन्यांचे बाजार भांडवल वाढले:

अदानी समूहाच्या काही कंपन्यांच्या बाजार भांडवलात सुधारणा दिसून आली. अदानी पॉवरने बाजार भांडवलामध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली.

गेल्या आठवड्यात अदानी पॉवरच्या बाजार भांडवलात 5,775 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे बाजार भांडवल 698 कोटी रुपयांनी वाढले आहे.