Cryptocurrency Market: निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोबद्दल दिला इशारा; म्हणाल्या, अर्थव्यवस्थेचे...|Crypto assets need urgent attention says Nirmala Sitharaman | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nirmala Sitharaman

Cryptocurrency Market: निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोबद्दल दिला इशारा; म्हणाल्या, अर्थव्यवस्थेचे...

Cryptocurrency Market: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोकरन्सीबद्दल सतर्क केले आहे आणि सांगितले की प्रत्येकाने त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्या म्हणाल्या की, अर्थव्यवस्थेचे कोणतेही नुकसान होणार नाही. वॉशिंग्टन डीसीमध्ये जी-20 बैठकीदरम्यान अर्थमंत्र्यांनी माहिती दिली.

निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी IMF मुख्यालयात G20 वित्तमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर यांच्यासमवेत "क्रिप्टो मालमत्तांचे मॅक्रोफायनान्शियल इम्प्लिकेशन्स" या विषयावरील विचारमंथन सत्रात भाग घेतला.

यादरम्यान त्यांनी क्रिप्टोकरन्सीबद्दल त्यांचे मत मांडले. याबाबत सर्वसमावेशक नियमावलीकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले. भारत सध्या G20 चा अध्यक्ष आहे.

क्रिप्टो चर्चा G20 देशांमध्ये तीव्र होत आहे :

क्रिप्टोकरन्सी संदर्भात G20 देशांमध्ये चर्चा तीव्र होत आहे, ज्यामुळे या देशांमध्ये क्रिप्टो एक प्रमुख समस्या म्हणून उदयास आली आहे. अनेक देश याबाबत सहमत आहेत, तर काही देशांचे मत वेगळे आहे. तज्ज्ञांनीही या विषयावर माहिती दिली आहे.

निर्मला सीतारामन म्हणाल्या की G20 ने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि फायनान्शियल स्टॅबिलिटी बोर्ड (FSB) च्या धोरण आणि नियामक फ्रेमवर्कवर काम चालू आहे.

अर्थमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक :

निर्मला सीतारामन म्हणाल्या की मला आनंद आहे की सर्व G20 देशांनी हे मान्य केले आहे की क्रिप्टो चलनाविरूद्ध कोणतीही कारवाई करायची असल्यास ती जागतिक असली पाहिजे आणि सर्व देशांनी याला लगेच प्रतिसाद दिला.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीव्यतिरिक्त, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनीही G20 सदस्य देशांच्या मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांशी महत्त्वपूर्ण बैठक घेतली.

आर्थिक अस्थिरतेचा धोका :

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, G20 सदस्य देशांचे एकमत झाले आहे की कोणताही एक देश क्रिप्टो चलनाच्या आव्हानांना स्वतःहून सामोरे जाऊ शकत नाही आणि यासाठी जागतिक समज निर्माण करण्याची गरज आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की क्रिप्टो चलनामुळे मॅक्रो इकॉनॉमिक अस्थिरता येऊ शकते.

गेल्या काही दिवसांत क्रिप्टोमध्ये वाढ झाली :

क्रिप्टोकरन्सीची अनेक नाणी जागतिक आणि भारतीय क्रिप्टो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार करत आहेत. बिटकॉइन आणि इथर व्यतिरिक्त, टॉप डिजिटल कॉईनमध्ये वाढ झाली आहे. शुक्रवारी, क्रिप्टो बाजार 4 टक्क्यांहून अधिक तेजीसह व्यवहार करत होता.