Plastic Company च्या शेअर्समध्ये तेजी, तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर? | Share market News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Plastic Company

Plastic Company च्या शेअर्समध्ये तेजी, तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर?

प्लॅस्टिकच्या वस्तू बनवणाऱ्या सुप्रीम इंडस्ट्रीजच्या (Supreme Industries) शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना कायमच चांगला परतावा दिला आहे. सध्या त्याचे शेअर्स काहीसे कमकुवत दिसत आहेत, पण यामध्ये गुंतवणुकीची ही योग्य संधी असल्याचे शेअर मार्केट एक्सपर्ट सांगत आहेत.

ब्रोकरेजने तर या शेअर्समध्ये मजबूत तेजी येण्याचा विश्वास आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म शेअरखानने तर हे शेअर आताच्या किंमतीपासून 20 टक्क्यांहून अधिक वाढू शकतात असे म्हटले आहे. सध्या हे शेअर्स 2540.60 रुपयांवर ट्रेड करत आहेत. (do you have this Plastic Company share named Supreme Industries)

या तिमाहीत पीव्हीसीच्या किमती वाढल्या आहेत, ज्याचा फायदा सुप्रीम इंडस्ट्रीजला मिळू शकतो. गेल्या चार तिमाहीत सातत्याने घसरणीनंतर जानेवारी-मार्च 2023 मध्ये पीव्हीसीच्या किमती 9.2 टक्क्यांनी म्हणजे 7.9 रुपये प्रति किलोने वाढल्यात.

प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन आणि स्मार्ट सिटीजमधील वाढत्या वाटपाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम इंडस्ट्रीजचा व्यवसाय आर्थिक वर्ष 2024 मध्ये मजबूत दिसत आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये प्लास्टिक पाईपच्या प्रमाणात 13-15 टक्के वाढ होऊ शकते असे क्रिसिलच्या अहवालात म्हटले आहे.

सुप्रीमचे शेअर्स 20 मार्च 2009 रोजी 20.21 रुपयांना होते. आता तो 2540.60 रुपयांवर आहे. म्हणजे 14 वर्षात गुंतवणूकदारांच्या भांडवलात 12471 टक्क्यांनी वाढ झाली असून केवळ 80 हजार रुपयांच्या गुंतवणुकीने गुंतवणूकदार कोट्यधीश झाले आहेत.

तर गेल्या वर्षी 28 फेब्रुवारी 2023 रोजी ते 2816.45 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर होते. पण, शेअर्सची वाढ इथेच थांबली आणि अवघ्या चार महिन्यांत ते 23 जून 2022 रोजी 1668.60 रुपयांपर्यंत खाली आले. ही एका वर्षातील नीचांकी पातळी आहे.

याशिवाय, कंपनीने 16,800 मेट्रिक टन क्षमतेच्या ओडिशा प्लांटमधून फेब्रुवारीपासून कमर्शियल प्रॉडक्शन सुरू केले आहे. चालू आर्थिक वर्षात ग्रीनफिल्ड कॅपिसिटी आणि ब्राउनफिल्ड कॅपिसिटीत वाढ झाल्यामुळे, सुप्रीमची इंडस्ट्रीची वाढ इंडस्ट्रीच्या वाढीपेक्षाही जास्त असू शकते. या सर्व कारणांमुळे, देशांतर्गत ब्रोकरेज फर्म शेअरखानने स्टॉकला पुन्हा बाय रेटिंग देत 3,000 रुपये टारगेट निश्चित केले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.