Gautam Adani : एकच झटका, अन् अदानी शेअर्स भीडले गगनाला, जाणून घ्या सविस्तर

शेअर मार्केटमध्ये घसरण असूनही अदानी ग्रुपच्या बहुतांश कंपन्या आज तेजीत आहेत.
Gautam Adani
Gautam Adaniesakal

Adani Group Shares : अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये येत्या काळात मोठी तेजी दिसून येत आहे. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील या समूहाने 2.65 अब्ज डॉलरचे कर्ज वेळेपूर्वी फेडले आहे. ग्रुपने अंबूजा सिमेंट्सला खरेदी करण्यासाठी हे लोन घेतलं होतं. त्यामुळे त्यांनी शेअर्सपण गहाण ठेवले होते. कंपनीचा दावा आहे की आता त्यांचे निव्वळ कर्ज आणि एबिटा गुणोत्तर 2.81 पट झाले आहे.

24 जानेवारी रोजी हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे अदानी समूहाचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले. या अहवालात अदानी समूहावर शेअर्सच्या किमतीत फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता. अदानी समूहाने हे आरोप फेटाळले असले तरी, मात्र यामुळे अदानी समूहाचे शेअर्स सलग अनेक दिवस घसरले होते. या कारणास्तव अदानी समूहाला गुंतवणूकदार आणि कर्जदारांचा विश्वास जिंकण्यासाठी अनेक पावले उचलावी लागत आहेत. कर्ज कमी करणे हा याचाच भाग आहे.

Gautam Adani
Gautam Adani Net Worth : अदानींनी पुन्हा सगळ्यांना मागे टाकत, 24 तासात केली सर्वाधिक कमाई

दरम्यान, बाजारात घसरण होत असली तरी आज अदानी समूहाच्या बहुतांश शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. 10 पैकी आठ शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत. ग्रुपचे म्हणणे आहे की डिलिव्हरेजिंग प्रोग्राम हा पुरावा आहे की कंपनीकडे लिक्वीडीटीची कमतरता नाही. 12 मार्चपर्यंत, समूहाने $2.15 अब्ज कर्ज प्रीपेड केले होते. त्याची अंतिम मुदत ३१ मार्च होती.

त्याचप्रमाणे, अंबुजा सिमेंट्स खरेदी करण्यासाठी घेतलेल्या $700 दशलक्ष डॉलर्स कर्जाची परतफेड केली आहे. त्याची $203 दशलक्ष डॉलर्सची व्याजासह परतफेड केली आहे. अदानी समूहाच्या पोर्टफोलिओचे एकत्रित निव्वळ कर्ज ते ऑपरेटिंग रेशो हे आर्थिक वर्ष 2022 मधील 3.81पट होते. जे आर्थिक वर्ष 2023 मध्ये 3.27पट वाढले आहे.

Gautam Adani
Gautam Adani: गौतम अदानींना आणखी एक धक्का, हिंडनबर्ग रिपोर्ट मध्ये नाव आलेल्या ऑडिटर फर्मचा राजीनामा

कर्ज आणि शिल्लक

आर्थिक वर्ष 2023 मध्ये, प्रमोटर्सने समूहाच्या चार सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स GQG भागीदारांना 15,500 कोटी रुपयांना विकले. समूहाचे म्हणणे आहे की त्यांची रोख शिल्लक आता $4.75 अब्ज डॉलर्स (रु. 40,351 कोटी) आहे. एकूण रोख शिल्लक आणि फ्री फ्लो फॉर्म ऑपरेशन्स 77,889 कोटी रुपये होता. हे पुढील तीन वर्षांच्या डेट मॅच्युरीटी कव्हरपेक्षा जास्त आहे. कंपनीला आर्थिक वर्ष 2024 मध्ये 11,796 कोटी रुपये, 2025 मध्ये 32,373 कोटी रुपये आणि 2026 मध्ये 16,614 कोटी रुपयांचे कर्ज भरायचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com