Gautam Adani : अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये वाढ, तरीही ICRA ने दिले नकारात्मक रेटिंग, कारण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam Adani

Gautam Adani : अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये वाढ, तरीही ICRA ने दिले नकारात्मक रेटिंग, कारण...

Gautam Adani : शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी अदानी समूहाचे शेअर्स वधारले. समूहाचे शेअर्स 17 टक्क्यांपर्यंत तेजीसह बंद झाले. परंतु क्रेडिट रेटिंग एजन्सी ICRA ने अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) आणि अदानी टोटल गॅसवरील मूल्यांकन स्थिर वरून नकारात्मक केला आहे.

ICRA ने म्हणले आहे की स्पर्धात्मक दराने इक्विटी किंवा बाँडद्वारे देशांतर्गत आणि जागतिक बाजारातून कर्ज उभारण्याची अदानी समूहाची क्षमता तपासली जाईल. (Icra Ratings revises outlook on Adani Total, Adani Ports to negative)

शुक्रवारी अदानी पोर्ट्सचे शेअर्स 9.81 टक्क्यांनी वाढून 684.35 रुपयांवर बंद झाले, तर अदानी टोटल गॅसचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह उप्पर सर्किटला 781.85 रुपयांवर पोहोचला.

ICRA ने सांगितले की, अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्मच्या अहवालानंतर, समूह कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात बाँडद्वारे उभारलेल्या रकमेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.

त्यामुळे समूहाची आर्थिक ताकद कमी झाली आहे. हे लक्षात घेऊन मूल्यांकन सुधारण्यात आला आहे. 24 जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या आपल्या अहवालात हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर कंपन्यांच्या शेअर्समध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. मात्र, अदानी समूहाने हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगून फेटाळून लावले आहेत.

रेटिंग एजन्सीने म्हटले आहे की अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचा क्रेडिट गुणवत्तेवर होणारा परिणाम पाहिला जाईल. यासोबतच कंपनीची कर्ज स्थिती अजूनही मजबूत आहे. कंपनीने आंतरराष्ट्रीय बाँडद्वारे 650 दशलक्ष डॉलर कर्ज घेतले आहे, ते 2024-25 मध्ये परत करावे लागेल.