Global Capital Markets : 3 वर्षात एका लाखाचे 57 लाख, आता बोनस शेअर्सची घोषणा l Global Capital Markets share stock market financial company | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Global Capital Markets

Global Capital Markets : 3 वर्षात एका लाखाचे 57 लाख, आता बोनस शेअर्सची घोषणा

Global Capital Markets : शेअर बाजारात तुम्हाला चांगले पैसे कमावता येऊ शकतात, पण त्यासाठी संयम महत्त्वाचा आहे. लाँग टर्ममध्ये बऱ्याचशा शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना दमदार रिटर्न देत मालमाल केले आहे. ग्लोबल कॅपिटल मार्केट्सचा (Global Capital Markets) शेअर अशाच काही शेअर्सपैकी आहे ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना चांगला परतावा दिला आहे. ग्लोबल कॅपिटल मार्केट्स ही एक नॉन बँकिंग फायनांशियल कंपनी आहे. आता ग्लोबल कॅपिटल मार्केट्सने आपल्या गुंतवणुकदारांना बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे.

ग्लोबल कॅपिटल मार्केट्सने कमी कालावधीत चांगला रिटर्न दिला आहे. कंपनीने 17 मार्चला झालेल्या बैठकीत बोनस शेअर्सची घोषणा केली होती. या अंतर्गत एलिजिबल इन्व्हेस्टर्सना एक रुपयाची फेस व्हॅल्यू असणाऱ्या 10 शेअरवर 6 बोनस शेअर्स दिले जातील. कंपनीचे मार्केट व्हॅल्यूएशन 75.50 कोटी आहे. सध्या कंपनीचे शेअर्स 30.33 रुपयांवर ट्रे़ड करत आहेत.

मागच्या 5 दिवसांचा विचार केल्यास ग्लोबल कॅपिटल मार्केट्सच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. मागच्या 5 दिवसात हा शेअर जवळपास 25 टक्के खाली आला आहे. तर मागच्या एका महिन्यात त्याने 13 टक्के रिटर्न दिला आहे. तर मागच्या 6 महिन्यात हा शेअर 301 टक्क्याने वाढला आहे. मागच्या एका वर्षात या शेअरने 428.40 टक्के शानदार तेजी दिसून आली

मार्च 2020 मध्ये ग्लोबल कॅपिटल मार्केट्सच्या शेअरची किंमत केवळ 53 पैसे होती, जी आता वाढून 33.30 रुपयांवर पोहोचली आहे. 3 वर्षाक या स्टॉकने 5622 टक्क्यांचा दमदार रिटर्न दिला आहे. म्हणजेच फक्त 3 वर्षात गुंतवणुकदारांचे पैसे 57 पटीने वाढले आहेत. तर तुम्हीही 3 वर्षांपुर्वी या शेअरमध्ये 1 लाख गुंतवले असते तर आज त्याची किंमत 57 लाख झाली असती.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.