
IPO News : ग्लोबल सरफेसचा आयपीओ आजपासून खुला, किंमतीपासून गुंतवणुकीपर्यंत संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Global Surface IPO : ग्लोबल सरफेसचा (Global Surface) आयपीओ आज सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. 15 मार्चपर्यंत गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. या आयपीओसाठी 133-140 रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे.
शेअर्स ऍलॉटमेंट 20 मार्चला होईल. त्याच वेळी, त्याची कंपनी 23 मार्चला लिस्ट होईल. युनिस्टोन कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड ही लीड बुक रनिंग मॅनेजर आहे.
ग्लोबल सरफेसच्या आयपीओअंतर्गत 85.2 लाख नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. याशिवाय, कंपनीच्या विद्यमान भागधारक आणि प्रमोटर्सकडून 25.5 लाखांपर्यंत शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विकले जातील.
प्रमोटर मयंक शाह ओएफएसचा भाग म्हणून 14 लाख शेअर्स विकणार आहेत. तर श्वेता शाह 11.5 लाख शेअर्स विकणार आहे.
या आयपीओतून कंपनीची 154.98 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे. यासाठी 100 शेअर्सचा लॉट साइज निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे किमान 14 लॉट (1400 शेअर्स) अर्ज करू शकतात.
यातून मिळणारे 90 कोटी रुपये दुबईमध्ये मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी उभारण्यासाठी वापरले जातील. या अंतर्गत कंपनीच्या ग्लोबल सरफेस एफझेडईमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. प्लांट उभारण्यासाठी एकूण अंदाजे खर्च 150.74 कोटी रुपये आहे.
ग्लोबल सरफेस नॅचरल स्टोन्सवर प्रोसेसिंग आणि इंजीनियर क्वार्ट्जच्या प्रॉडक्शनचे काम करते. नॅचरल स्टोन क्लिष्ट जियोलॉजिकल प्रोसेसमधून तयार होतात.
याआधी कंपनीची आर्थिक कामगिरी निराशाजनक होती कारण तिच्या मार्जिनमध्ये घट दिसून आली आहे.आर्थिक वर्ष FY22 मध्ये कंपनीचा महसूल 190.31 कोटी होता.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.