Sundar Pichai: जागतिक मंदी आणि कर्मचारी कपातीच्या काळातही Google CEOची चांदी, मिळाले 'एवढ्या' कोटींचे पॅकेज|Alphabet CEO Sundar Pichai Income | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Google Sundar Pichai

Sundar Pichai: जागतिक मंदी आणि कर्मचारी कपातीच्या काळातही Google CEOची चांदी, मिळाले 'एवढ्या' कोटींचे पॅकेज

Alphabet CEO Sundar Pichai Income: गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी गेल्या वर्षभरात अल्फाबेटमधून मोठी कमाई केली आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात जाहीर करण्यात आली आहे.

अल्फाबेटने जागतिक स्तरावर 12 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. यासोबतच अनेक कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्येही कपात करण्यात आली आहे.

सुंदर पिचाई यांचे वेतन:

Alphabet Inc चे CEO सुंदर पिचाई यांचे वेतन पॅकेज 2022 मध्ये 226 दशलक्ष डॉलर इतके वाढले आहे. हा पगार गुगलच्या सामान्य कर्मचाऱ्यांच्या पगारापेक्षा 800 पट जास्त आहे.

गुगलच्या मूळ कंपनीने हा वाढीव पगार सुंदर पिचाई यांच्या कामावर आणि नवीन उत्पादनांच्या लाँचच्या प्रमोशन अंतर्गत दिला आहे.

पगार का वाढवला?

स्टॉक अवॉर्डमुळे सुंदर पिचाई यांच्या पगारात वाढ झाल्याची माहिती कंपनीने दिली आहे. त्यांच्या पगारात 218 दशलक्ष डॉलर स्टॉक पुरस्काराचा समावेश आहे. गुगलच्या मूळ कंपनीने शुक्रवारी केलेल्या फाइलिंगनुसार, स्टॉक अवॉर्ड्स वगळता त्यांचा पगार गेल्या वर्षी 6.3 दशलक्ष डॉलर होता.

2019 प्रमाणेच पॅकेज:

सुंदर पिचाई यांना 2019 प्रमाणेच पॅकेज देण्यात आले आहे. त्या वर्षात, त्यांना 281 दशलक्षचे पॅकेज मिळाले. स्टॉक अवॉर्ड दर तीन वर्षांनी दिला जातो.

अल्फाबेटने 12 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले:

जानेवारीमध्ये, अल्फाबेटने खर्च कमी करण्यासाठी आणि व्यवसाय मजबूत करण्यासाठी सुमारे 12,000 जागतिक कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची घोषणा केली.

कर्मचारी कपाती विरोधात संताप:

कर्मचारी कपाती विरोधात संताप व्यक्त करत गुगलच्या कर्मचाऱ्यांनी इंग्लंड मधील कार्यालयातून बाहेर पडून राजीनामा दिला. केवळ इंग्लंडमध्येच नाही तर स्वित्झर्लंडमध्येही हेच दिसून आले.

तेथेही कंपनीने 200 जणांना कामावरून काढून टाकल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी स्वतःहून कंपनी सोडली.

टॅग्स :salaryGoogleSundar Pichai