Hardwyn India SmallCap Share : 4 वर्षात गुंतवणूकदारांना बंपर परतावा; आता करणार स्टॉक स्प्लिट l Hardwyn India SmallCap Share stock market | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hardwyn India SmallCap Share

Hardwyn India SmallCap Share : 4 वर्षात गुंतवणूकदारांना बंपर परतावा; आता करणार स्टॉक स्प्लिट...

Hardwyn India SmallCap Share : हार्डविन इंडिया (Hardwyn India) स्मॉलकॅप शेअरने गेल्या काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. आता कंपनी आपले शेअर्स म्हणजेच स्टॉक स्प्लिट करण्याच्या तयारीत आहे. हार्डविन इंडियाने बुधवारी अर्थात 12 एप्रिलला स्टॉक एक्स्चेंजला ही माहिती दिली.

26 एप्रिलला त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली. या बैठकीत स्टॉक स्प्लिटच्या निर्णयावर विचार केला जाणार आहे. यामुळेच गेल्या काही दिवसांपासून या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.

बुधवारी हार्डविन इंडियाचा शेअर बीएसईवर 254.75 रुपयांवर बंद झाला. पण 4 वर्षांपूर्वी 26 एप्रिल 2018 रोजी कंपनीचे शेअर्स प्रथम बीएसईवर लिस्ट झाले होते. तेव्हा त्याची किंमत त्यावेळी फक्त 6.65 रुपये होती. तेव्हापासून म्हणजे गेल्या 4 वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 3,730.83% वाढ झाली आहे.

म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराने 4 वर्षांपूर्वी हार्डविन इंडियाच्या शेअर्समध्ये 1 लाख गुंतवले असते तर आज त्या 1 लाखाचे सुमारे 38 लाख झाले असते. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात हार्डविन इंडियाचा शेअर सुमारे 189.49 टक्क्यांनी वाढला आहे. पण या वर्षाच्या सुरुवातीपासून त्यात 25.22% ने घसरण झाली आहे.

हार्डविन इंडिया ही स्मॉलकॅप कंपनी असून तिचे मार्केट कॅप 659 कोटी आहे, ही कंपनी कमर्शियल सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. ही आर्किटेक्चरल हार्डवेअर आणि ग्लास फिटिंग्ज बनवणारी प्रमुख कंपनी आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या तिमाहीत 3.27 कोटीवरुन वाढून 4.73 कोटी झाला आहे. त्याच वेळी, कंपनीचे एकूण उत्पन्न 34.73 कोटी होते, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 30 कोटी होता.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :Share MarketStock Market