

Share Market Investment Tips: आज देशभरात दिवाळी साजरी होत आहे. आज बाजारात सामान्य व्यवहार होतील. उद्या शुक्रवारी सायंकाळी मुहूर्त ट्रेडिंग व्यवहार होतील. जागतिक बाजारपेठेत घसरण होत असून, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसून येत आहे.
भारतीय शेअर बाजारातील निफ्टी निर्देशांक बुधवारी 30 ऑक्टोबरला 24,350 वर नकारात्मक ट्रेंडसह बंद झाला. दिवसाच्या शेवटी सेन्सेक्स 426.85 अंकांनी घसरून 79,942.18 वर बंद झाला. निफ्टी 126 अंकांनी घसरून 24,340.80 वर बंद झाला. कालच्या सत्रात 2787 शेअर्स वधारले तर 978 शेअर्स घसरलेले पाहायला मिळाले.