IPO News : मालामाल होण्याची सुवर्ण संधी! लवकरच येणार ‘या’ कंपनीचा IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी

IPO अंतर्गत 75 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील.
IPO News
IPO NewsNews

Rishabh Instruments IPO News : आयपीओमध्ये पैसे गुंतवून तुम्हाला चांगले पैसे कमवायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ऋषभ इन्स्ट्रुमेंट्स (Rishabh Instruments ) या कंपनीच्या आयपीओला सेबीने मान्यता दिली आहे.

ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार (DRHP), या आयपीओअंतर्गत 75 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. याशिवाय, प्रमोटर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत 94.17 लाख इक्विटी शेअर्स विकले जातील.

ओएफएसचा भाग म्हणून, आशा नरेंद्र गोलिया 25 लाख इक्विटी शेअर्स विकतील, नरेंद्र ऋषभ गोलिया (HUF) 5.17 लाख शेअर्स विकतील, ऋषभ नरेंद्र गोलिया 4 लाख शेअर्स विकतील आणि SACEF होल्डिंग्स II कंपनीतील 60 लाख इक्विटी शेअर्स विकतील.

कंपनीने डिसेंबर 2022 मध्ये सेबीकडे मसुदा कागदपत्रे दाखल केली होती आणि 17 फेब्रुवारीला ऑब्झर्वेशन लेटर मिळाले आहे.

IPO News
Share Market : शुगर स्टॉक्समध्ये 40% घसरण, जाणून घ्या का कमी झाला गोडवा?

ही फर्म 15 कोटी रुपयांच्या प्री-आयपीओ प्लेसमेंटचाही विचार करू शकते. असे प्लेसमेंट केले तर फ्रेश इश्युचा आकार कमी होईल.

आयपीओअंतर्गत उभारलेल्या निधीपैकी 59.50 कोटी रुपये नाशिकमधील कंपनीच्या मॅन्युफॅक्टरिंग फॅसिलिटीसाठी वापरण्यात येणार आहेत. याशिवाय हा निधी इतर कॉर्पोरेट कारणांसाठीही वापरला जाईल.

ऋषभ इन्स्ट्रुमेंट्स ही कंपनी इलेक्ट्रिकल ऑटोमेशन डिव्हाईस डिझाईन, डेव्हलपिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि सप्लायमध्ये गुंतली आहे.

कंपनी मीटरिंग, कंट्रोल आणि प्रोटेक्शन डिव्हाईस, पोर्टेबल टेस्ट आणि सोलर स्ट्रिंग इनव्हर्टरमध्ये काम करते.

IPO News
का वाढतात रिअल इस्टेटचे भाव?

याव्यतिरिक्त, कंपनी ऍल्युमिनियम हाय प्रेशर डाय कास्टिंग्जचे उत्पादन आणि पुरवठा करण्यात गुंतलेली आहे. नाशिकमध्ये त्याच्या दोन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com