
Share Market : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील अॅक्शनमध्ये ?
Share Market : सोमवारी बाजार वाढीसह बंद झाला. मेटल, आयटी आणि फार्मामधील खरेदीच्या जोरावर निफ्टी 18300 च्या वर बंद झाला. सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचे झाले तर मेटल इंडेक्स 3 टक्क्यांनी तर आयटी इंडेक्स 2 टक्क्यांनी वधारला. कॅपिटल गूड्स, ऑईल अँड गॅस आणि हेल्थकेअर इंडेक्स प्रत्येकी 1 टक्क्यांनी वाढले.
आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
निफ्टीने मागील ट्रेडिंग सत्रातील तेजी कायम ठेवल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले. सोमवारी तो 100 हून अधिक वाढीसह बंद झाला. डेली चार्टवर, 20 दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजपासून (18115) सुरू झालेली निफ्टीमधील तेजी सोमवारीही सुरूच राहिली. वरच्या बाजूने, निफ्टीला 18350-18375 च्या झोनमध्ये शॉर्ट टर्म रझिस्टंसचा सामना करावा लागतोय. तर, डाउनसाइडवर 18210 - 18250 वर सपोर्ट आहे.
गेल्या आठवड्यात मंदीनंतर बाजारात पुन्हा तेजी आल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे सिद्धार्थ खेमका यांनी सांगितले. स्टॉक स्पेसिफिक ऍक्शनसह बाजाराचा दृष्टिकोन सकारात्मक असल्याचे ते म्हणाले. पुढील काही दिवसांत, गुंतवणूकदार आणि व्यापारी एफऑएमसी मिनिट्स, यूएस मधील जीडीपी डेटा आणि यूके आणि जपानचा किरकोळ महागाई डेटा यासारख्या जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवतील. (Investment)
आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते ?
अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
डिव्हीस लॅब (DIVISLAB)
अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)
टेक महिन्द्रा (TECHM)
बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)
एम फॅसिस (MPHASIS)
पर्सिस्टंट (PERSISTENT)
ऑरो फार्मा (AUROPHARMA)
भारतीय कंटनेर निगम (CONCOR) (Share Market)
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.