Stock Market Closing Today: भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. चांगले तिमाही निकाल, परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीच्या अपेक्षांमुळे बाजारात प्रचंड वाढ झाली..सेन्सेक्स 862 अंकांनी वाढलाआजच्या व्यवहारात BSE Sensex तब्बल 862.23 अंकांनी वाढून 83,467.66 वर बंद झाला. तर Nifty 50 नेही 261.75 अंकांची वाढ घेत 25,585.30 चा टप्पा गाठला. परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा खरेदीचा मोर्चा सुरू केल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे..RBI New Rule: एका दिवसात नाही तर फक्त 3 तासात चेक पास होणार; RBIचा मोठा निर्णय, कधी पासून लागू होणार नियम? .फक्त दोन दिवसांत ₹7 लाख कोटींची वाढगेल्या दोन दिवसांत बाजारात सलग तेजी पाहायला मिळाली आहे. या काळात Sensex सुमारे 1,430 अंकांनी म्हणजेच 1.75% ने वाढला. BSE वर लिस्टेड कंपन्यांचे एकत्रित मार्केट कॅप ₹4,59,67,652 कोटींनी वाढून ₹4,66,70,952 कोटींवर पोहचले. म्हणजेच गुंतवणूकदारांची संपत्ती तब्बल ₹7.03 लाख कोटींनी वाढली आहे..कोणते शेअर्स चमकले?आजच्या व्यापारात सेन्सेक्समधील बहुतेक शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले. सर्वाधिक खरेदी Titan Company, Kotak Mahindra Bank, Axis Bank, Adani Ports आणि Mahindra & Mahindra मध्ये झाली. तर Eternal, Bharti Airtel आणि Infosys चे शेअर्स घसरणीसह लाल रंगात बंद झाले..Premium|Gold Buying Guide: दिवाळीत सोनं घ्यायचं असेल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?.मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही तेजीआज NSE Midcap 100 निर्देशांक 0.46% ने वाढला, तर Smallcap 100 मध्ये 0.24% ची वाढ झाली. लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांचा उत्साह वाढताना दिसला. सेक्टरनिहाय पाहिल्यास जवळपास सर्वच निर्देशांक आज हिरव्या रंगात बंद झाले. सर्वाधिक वाढ Nifty FMCG Index मध्ये झाली. त्याचबरोबर Auto आणि Realty क्षेत्रांतील शेअर्समध्येही जोरदार खरेदी झाली..शेअर बाजारातील तेजीचे कारणं काय?गुंतवणूकदारांना आशा आहे की अमेरिकन फेडरल रिझर्व्ह या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या बैठकीत व्याजदरात कपात करेल. अनेक भारतीय कंपन्यांचे तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले आहेत. परदेशी गुंतवणूकदार (FII) आणि देशांतर्गत गुंतवणूकदार (DII) या दोघांनीही मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. भारत-अमेरिका व्यापार चर्चेची शक्यता आहे.या सर्व घटकांमुळेच शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळाली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.