Mukesh Ambani : मुकेश अंबानींची आरोग्य क्षेत्रात एन्ट्री; 'या' कंपनीसोबत केला मोठा करार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mukesh Ambani

Mukesh Ambani : मुकेश अंबानींची आरोग्य क्षेत्रात एन्ट्री; 'या' कंपनीसोबत केला मोठा करार

Mukesh Ambani News:  मुकेश अंबानी यांचा रिलायन्स समूह आता आणखी एका व्यवसायात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज जेनेटिक मॅपिंगमध्ये सहभागी होत आहे.

23andMe सारख्या अमेरिकन स्टार्टअप्स सोबत ते व्यवसाय करणार आहेत. भारताची वाढती ग्राहक बाजारपेठ आणि आरोग्यसेवा व्यापक बनत आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, स्ट्रँड लाइफ सायन्सेस प्रायव्हेटचे सीईओ रमेश हरिहरन म्हणाले की, एनर्जी-टू-ईकॉमर्स समूह 12,000 रुपयांची (डॉलर145) जीनोम चाचणी आठवड्यांच्या आत सादर करेल.

रिलायन्स इंडस्ट्रीजने स्ट्रँड लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये हिस्सा खरेदी केला होता आणि आता त्यांची 80 टक्के हिस्सेदारी आहे.

स्ट्रँड लाइफचे सीईओ म्हणाले की, जीनोम चाचणी ही इतर स्थानिक चाचण्यांपेक्षा 86 टक्के स्वस्त आहे.

कर्करोग, हृदय आणि न्यूरो-डिजनरेटिव्ह रोग तसेच अनुवांशिक रोग ओळखण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो असे ते म्हणाले.

1.4 अब्ज लोकांना होणार फायदा :

हा प्रकल्प भारतातील 1.4 अब्ज लोकांसाठी परवडणारी वैयक्तिक जेन-मॅपिंग आणेल. ते परवडणाऱ्या किंमतीत दिले जाईल. कंपनीच्या सीईओने सांगितले की, हे जगातील सर्वात स्वस्त जीनोमिक प्रोफाइल असेल.

अहवालात असे म्हटले आहे की, मुकेश अंबानी यांनी 2006 मध्ये रिटेल क्षेत्रात आणि 2016 मध्ये टेलिकॉम क्षेत्रात एंट्री घेतली.

त्यानंतर त्यांनी त्या क्षेत्रातील किंमती कमी केल्या आणि कंपनी मार्केट लीडर होईपर्यंत या किंमती वाढवल्या गेल्या नाहीत. पण नंतर मार्केटवर पकड घेतल्या नंतर त्यांनी किंमती वाढवल्या आहेत.

अनुवांशिक चाचणी बाजार :

अलाईड मार्केट रिसर्चच्या अहवालानुसार, 2019 मध्ये जागतिक अनुवांशिक चाचणी बाजाराचे मूल्य 12.7 अब्ज डॉलर होते आणि 2027 पर्यंत 21.3 अब्ज डॉलर होण्याची अपेक्षा आहे.