Share Market : 47 पैशांच्या 'या' शेअरने गुंतवणूकदारांना केले कोट्याधीश; तुमच्याकडे आहे का हा शेअर?

गेल्या दोन दिवसांत या शेअरमध्ये तीन टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
Share Market
Share MarketSakal

Share Market Investment Tips : एनएमडीसीचे (NMDC) शेअर्स गेल्या एका महिन्यात सात टक्क्यांपेक्षा जास्त खाली आले आहेत. पण गेल्या दोन दिवसांत त्यात तीन टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

लाँग टर्ममध्ये त्यांनी गुंतवणुकदारांना अवघ्या 41 हजारांत कोट्यधीश बनवले आहे. भविष्याचा विचार केल्यास हे शेअर्स 155 रुपयांपर्यंत वाढू शकतात.

म्हणजेच आता तुम्ही गुंतवणूक केली तर यात तुम्हाला 36% नफा मिळू शकतो. सध्या एनएमडीसीचे शेअर्स 3.06 टक्क्यांच्या वाढीसह 114.50 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

एनएमडीसी ही नवरत्न कंपनी असून देशातील एकमेव लोहखनिज कंपनी आहे.आर्थिक वर्ष 2022 मध्ये, कंपनीने 42 दशलक्ष टन लोह खनिजाचे उत्पादन केले होते, त्यापैकी 41 दशलक्ष टन विकले गेले.

आता पुढील आर्थिक वर्ष 2024 पर्यंत 50 दशलक्ष टन उत्पादन करण्याचे आणि नंतर ते मध्यम मुदतीत 7-75 दशलक्ष टनांपर्यंत नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

कंपनीचे एबिटदा मार्जिन आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 34.3 टक्के आणि आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 35.5 टक्के असू शकते असे देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे म्हणणे आहे.

Share Market
Sensex : निर्देशांकांची पुन्हा घसरगुंडी; सेन्सेक्स एकोणसाठ हजारांखाली

यामुळेच आयसीआयसीआय सिक्युरिटीजने 140 रुपयांच्या टारगेटसह बाय रेटिंग कायम ठेवले आहे. तर ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी एनएमडीसीच्या गुंतवणुकीसाठी 155 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे.

2 फेब्रुवारी 2001 रोजी एनएमडीसीचे शेअर्स फक्त 47 पैशांना मिळत होते. आता ते 114.50 रुपयांच्या किंमतीवर पोहोचलेत.

म्हणजेच या शेअर्सने केवळ 41,000 रुपयांच्या गुंतवणुकीने 22 वर्षांत गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. गेल्या वर्षी 11 एप्रिल 2022 रोजी त्याची किंमत 143.13 रुपये होती, जी एका वर्षातील उच्चांक आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Share Market
बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com