Multibagger Stock : कमाल आहे हा शेअर! १० हजाराच्या गुंतवणुकदाराला बनवलं करोडपती l Multibagger Stock Resin Adhesives share market stocks investor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Multibagger Stock

Multibagger Stock : कमाल आहे हा शेअर! १० हजाराच्या गुंतवणुकदाराला बनवलं करोडपती

Multibagger Stock : शेअर बाजारात गुंतवणुकदारांना नेहमी सल्ला दिला जातो की, चांगल्या स्टॉकमध्ये गुंतवणुक करून रिटर्न्सची वाट पहावी. गुजरातची सिंथेटिक मॅन्युफॅक्चरींग कंपनी Resin Adhesives ने या गोष्टीला खरं सिद्ध केलं आहे. केवळ १० हजाराच्या गुंतवणुकदाराला करोडपती बनवलं. कंपनीच्या शेअर्सच्या किंमतींमध्ये मागील १५ वर्षात १ लाख २५ हजार ५३९ टक्कांची तेजी बघायला मिळाली.

कर्जमुक्त कंपनी Resin Adhesives च्या एका शेअरचा भाव मार्च २००८ मध्ये ०.८९ पैसे होता. जो १७ मार्च २०२३ ला १११४ रुपये ट्रेड करत होता. तेव्हा ज्यांनी कोणी Resin Adhesives मध्ये १० हाजार रुपयांची गुंतवणुक केली असेल त्यांचा रिटर्न वाढून १.२५ रुपये झाला असेल. गुंतवणुकदारांसाठी चांगली गोष्ट ही आहे की, आर्थिक वर्ष २२मध्ये कंपनी सेल्समध्ये ३५ टक्क्यांनी आणि नेट प्रॉफीटमध्ये ५० टक्क्यांनी वाढ बघायला मिळत आहे.

Resin Adhesives के शेअर्स मागील एक वर्षात ८० टक्क्यांनी अधिक तेजीत बघायला मिळत आहेत. पण गुंतवणुकदारांसाठी मागील ६ महिने फार चांगले नव्हते. या काळात कंपनीच्या शेअर्सचा भाव ३२ टक्क्यांची घसरण बघायला मिळाली. ही घसरण मागील १ वर्षापासून सुरू आहे. याकाळात शेअर साधारण १२ टक्क्यांनी खाली आला. कंपनीचा ५२ वीक हाय १८१८.४५ रुपये प्रति शेअर आणि ५२ वीक लो ६०६.६७ रुपये प्रति शेअर होता.