Muthoot Finance : गोल्ड लोन देणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये येत्या काळात तेजीची शक्यता

ब्रोकरेज फर्म चोला वेल्थ डायरेक्टने नुकत्याच दिलेल्या अहवालात याचा अंदाज वर्तवला आहे.
Muthoot Finance Share Market Investment Tips
Muthoot Finance Share Market Investment Tips esakal

Share Market Investment Tips : एनबीएफसी सेक्टरमधील मुथूट फायनान्सचे (Muthoot Finance) शेअर्स येत्या काळात किमान 41 टक्के वाढू शकतात असा विश्वास शेअर बाजार एक्सपर्ट्स व्यक्त करत आहेत.

ब्रोकरेज फर्म चोला वेल्थ डायरेक्टने नुकत्याच दिलेल्या अहवालात याचा अंदाज वर्तवला आहे. त्यांनी मुथूट फायनान्सच्या शेअर्ससाठी 1,350 रुपयांचे आहे.

हे सध्याच्या बाजारभावापेक्षा 41 टक्क्यांनी जास्त आहे. हा मिडकॅप स्टॉक आहे आणि एनबीएफसी सेक्टरमधील गोल्ड लोन सेगमेंटमध्ये व्यवसाय करतो. कंपनीचे मार्केट कॅप 38.44 हजार कोटी आहे.

मुथूट फायनान्सचे शेअर्स सध्या 967 रुपयां ट्रेड करत आहेत. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 5.49% ने घसरण झाली आहे. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात त्याचा हिस्सा 28.83 टक्क्यांनी घसरला आहे. कंपनीचे शेअर्स सध्या 10.68 च्या पीई रेशोवर व्यवहार करत आहेत.

मुथूट फायनान्स सध्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर ट्रेड करत आहे, त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,448 रुपये आहे. त्याच वेळी, त्याची गेल्या 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 947.40 रुपये आहे.

Muthoot Finance Share Market Investment Tips
Sandur Manganese Shares : संदुर मँगनीजच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी, अधिक जाणून घेऊयात...

मुथूट फायनान्स नफ्याच्या खर्चावर गोल्ड लोनमध्ये वाढ करणार नाही असा आमचा विश्वास असल्याचे ब्रोकरेजने सांगितले. आम्हाला आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीच्या स्टँडअलोन एयूएममध्ये 10% वाढ अपेक्षित आहे. त्यामुळेच त्यांनी 1,350 रुपयांच्या टारगेटसह स्टॉकवर बाय रेटींग दिली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com