Gautam Adani Net Worth : अदानींनी पुन्हा सगळ्यांना मागे टाकत, 24 तासात केली सर्वाधिक कमाई l Net Worth Gautam Adani Once Again In World's Top Billionaires List | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam Adani Net Worth

Gautam Adani Net Worth : अदानींनी पुन्हा सगळ्यांना मागे टाकत, 24 तासात केली सर्वाधिक कमाई

Gautam Adani Once Again In World's Top Billionaires List : जगातल्या टॉप अरबपतींमध्ये भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांची पुन्हा एकदा जोरदार वापसी झाली आहे. अदानी ग्रुप कंपनीच्या शेअर्समध्ये मागील तीन वर्किंग डेजमध्ये जोरदार तेजी दिसत आहे. त्यामुळे अदानींच्या एकूण उत्पन्नातही वाढ दिसून येत आहे. मागील काही तासांमध्ये अदानींचे उत्पन्न ९ अरब डॉलर्सने वाढलं आहे.

एका दिवसात ७७,००० कोटींची कमाई

फोर्ब्सच्या रियल टाईम बिलेनियर्स इंडेक्सनुसार २३ मे ला २४ तासात गौतम अदानी यांना ९.३ अरब डॉलर्स म्हणजे साधारण ७७,००० कोटी रुपयांचा जास्त फायदा झाला आहे. मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी अदानी यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी नोंदवली गेली आहे. दरम्यान Adani Power आणि Adani Green सोबतच ग्रुपच्या पाच कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट दाखवत आहेत. तर Adani Enterprises मध्ये १४ टक्के आणि Adani Wilmer मध्यो १० टक्के तेजी होती. दिवसाच्या शेवटाला गौतम अदानींचे सर्व स्टॉक हिरव्या निशाणासह बंद झाले. या तेजीमुळे मार्केट पॅपिटलायझेशम १० लाख कोटी रुपयांच्या पार पोहचले.

या श्रीमंतांपेक्षाही जास्त कमवलं

फोर्ब्जनुसार मागच्या वर्षी २०२२ मध्ये गौतम अदानी यांची कमाई जगातल्या सर्व श्रीमंतांपेक्षा जास्त होती. आणि मंगळवारीही त्यांनी पुन्हा तशीच आघाडी मारली. एका दिवसाच्या कमाईच्या दृष्टीने त्यांनी जगातले क्रमांक एकचे श्रीमंत बर्नार्ड अर्नाल्ट आणि दुसऱ्या क्रमांकावरचे एलॉन मस्क सहित अनेकांना मागे सोडले आहे. ज्या २४ तासात अदानी यांचा नफा ९,३ अरब डॉलर्स होता त्यावेळी एलॉन मस्क यांचा ५.७ अरब डॉलर्स होता. तर बर्नार्ड अर्नाल्ट यांच्या संपत्तीत ५.८ अरब डॉलर्सची तेजी आली.

सगळ्यात श्रीमंताच्या यादीत अदानी २४ वे

नेटवर्थमध्ये झालेल्या वाढीमुळे गौतम अदानी यांचं एकूण उत्पन्न वाढून ५५ अरब डॉलर्स झालं आहे. एवढी संपत्ती असूनही जगातल्या सर्वात श्रीमंतांच्या यादीत त्यांचा क्रमांक २४ वा आहे. मागील काही काळापासून त्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. २४ जानेवारी २०२३ मध्ये हिंडनबर्गच्या रिसर्च रिपोर्टनुसार त्यांच्या संपत्तीत ६०.७ अरब डॉलर्सची मोठी घट झाली होती.

श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी १४ वे

अरबपतींच्या यादीत गौतम अदानी यांच्याशिवाय रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा समावेश आहे. त्यांच नेटवर्थ ८७.३ अरब डॉलर्स असून ते जगातल्या श्रीमंतांच्या यादीत १४ व्या क्रमांकावर आहेत. मागील २४ तासात त्यांच्या नेटवर्थमध्ये ३८९ मिलीयन डॉलर्स साधारण ३२२२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मागील काही दिवसांत अंबानी आणि फेसबूकचे मार्क झुकरबर्ग यांच्यामध्ये कोण आधी अशी चढाओढ बघायला मिळत आहे. मार्क झुकरबर्ग यांचं ८८.३ नेटवर्थ असून श्रीमंतांच्या यादीत ते १३ व्या स्थानावर आहेत.