Pulsar International : 4 वर्षात शेअरची गगनभरारी, दररोज अप्पर सर्कीट l Pulsar International share market stocks small cap multibagger | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pulsar International

Pulsar International : 4 वर्षात शेअरची गगनभरारी, दररोज अप्पर सर्कीट

Pulsar International Shares : पल्सर इंटरनॅशनल (Pulsar International) ही स्मॉल कॅप कंपनी आहे, जी ट्रेडिंग आणि डिस्ट्रीब्यूशन इंडस्ट्रीमध्ये आहे. कंपनीचे मार्केट कॅप फक्त 6.22 कोटी रुपये आहे. पल्सर इंटरनॅशनलच्या शेअर्सने गेल्या 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

गेल्या 4 वर्षात शेअरची किंमत 1 रुपयावरून 20.72 रुपयांपर्यंत वाढली आहे आणि या काळात त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 1,800% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये तेजीचा कल अजूनही आहे आणि गेल्या काही दिवसांत यात सतत अप्पर सर्कीट लागत आहे.

पल्सर इंटरनॅशनलचे शेअर्स गेल्या 6 महिन्यांत 2.27 रुपयांवरून 20.72 रुपयांपर्यंत वाढले आहे. अशा प्रकारे, गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 812.78% वाढ झाली आहे. त्याच वेळी गेल्या एका वर्षात त्याच्या शेअर्सचा परतावा 416.71% झाला आहे.

कंपनीचे बीएसईवर लिस्टिंग झाल्यापासून परतावा वाढला आहे. पल्सर इंटरनॅशनलचे शेअर्स सुमारे 4 वर्षांपूर्वी 13 मार्च 2019 रोजी बीएसईवर लिस्ट झाले होते. त्या दिवशी त्याच्या शेअर्सची किंमत 1.05 रुपये होती, जी आता 20.72 रुपये झाली आहे. म्हणजेच गेल्या 4 वर्षांत त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 1,873.33% चा बंपर परतावा दिला आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने 4 वर्षांपूर्वी पल्सर इंटरनॅशनलच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याची किंमत 19.73 लाख रुपये झाली असती.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.