Reliance Industries: भरघोस नफ्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचा धक्कादायक निर्णय; मोठ्या गुंतवणुकीची...|Reliance Industries withdraws planned merger of new energy business with itself | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mukesh Ambani

Reliance Industries: भरघोस नफ्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचा धक्कादायक निर्णय; मोठ्या गुंतवणुकीची...

Reliance New Energy Business: मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेड (RNEL) विलीन करणार नाही. नियामक फाइलिंगमध्ये माहिती देताना रिलायन्स इंडस्ट्रीजने सांगितले की, रिलायन्स इंडस्ट्रीज आता या व्यवसायाचे विलीनीकरण करणार नाही.

21 एप्रिल रोजी झालेल्या नवीन ऊर्जा व्यवसाय आणि गुंतवणूक संरचनेवरील आढावा बैठकीनंतर हा निर्णय झाला आहे.

तेल ते दूरसंचार व्यवसाय करणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, बोर्डाच्या बैठकीत रिन्यूएबल एनर्जी व्यवसाय केवळ न्यू एनर्जी लिमिटेड (RNEL) अंतर्गत चालेल असा निर्णय घेण्यात आला आहे.

विलीनीकरणाचा निर्णय मे महिन्यात घेण्यात आला होता:

भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 2022-23 च्या मार्च तिमाहीत 19,299 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. कंपनीने मागील वर्षाच्या तुलनेत 19 टक्के अधिक नफा नोंदविला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज अंतर्गत कोणत्याही प्रकारच्या करारासाठी किंवा नवीन ऊर्जा आणि इतर कामांसाठी निधी उभारणे शक्य झाले असते, परंतु आता रिलायन्सने या योजनेपासून एक पाऊल मागे घेतले आहे.

मुकेश अंबानी यांनी मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली होती:

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी 2021 मध्ये ऊर्जा उद्योग स्थापना करण्याची घोषणा केली होती. भविष्यात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणाही त्यांनी केली होती.

मुकेश अंबानी यांनी तीन वर्षांत 75,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना आखली होती. यामध्ये, आरआयएल पुढील तीन वर्षांत न्यू एनर्जीसाठी 60,000 कोटी रुपयांहून अधिक आणि इतर विविध व्यवसायांसाठी 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.