
Multibagger Stock: 3 वर्षात 1 लाखाचे झाले 43,00,000 रुपये, 'हा' पेनी स्टॉक देतोय जबरदस्त रिटर्न
Multibagger Stock Investment Tips : मल्टीबॅगर स्टॉक्स हे असे स्टॉक आहेत ज्याद्वारे तुम्ही कमी कालावधीत प्रचंड परतावा मिळवू शकता. यामुळेच बहुतेक गुंतवणूकदार अशा शेअर्सचा शोध घेतात. यातील धोका देखील खूप जास्त आहे.
जर तुम्ही मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल, तर तुम्ही मर्क्युरी मेटलवर (Mercury Metals) लक्ष ठेवू शकता. या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत हा स्टॉक 190% वाढला आहे. गेल्या शुक्रवारीही या शेअरमध्ये 5 टक्क्यांची तेजी दिसून आली.
स्टॉकची कामगिरी कशी आहे?
मर्क्युरी मेटल्सच्या (Mercury Metals) शेअर्सने गेल्या एका महिन्यात 10% परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत हा स्टॉक 190 टक्क्यांनी वाढला आहे. या वर्षी आतापर्यंत त्याचे शेअर्स 25 टक्क्यांनी वाढले आहेत. (₹0.34 to ₹15.62: Multibagger penny stock gives 4500% return in 4 years)
दीर्घ मुदतीत, या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना अविश्वसनीय नफा दिला आहे. गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना 1,580 टक्के नफा झाला आहे. त्याच वेळी, गेल्या 3 वर्षांत या स्टॉकमध्ये 4,238 टक्के वाढ झाली आहे.
3 वर्षात पैसा 43 पट वाढला :
मर्क्युरी मेटल्सच्या गुंतवणूकदारांच्या पैशात गेल्या तीन वर्षांत 43 पट वाढ झाली आहे. एप्रिल 2020 मध्ये, त्याच्या एका शेअरची किंमत फक्त 0.36 रुपये होती.
आता त्या शेअरची किंमत रु.15.62 पर्यंत वाढली आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमचे पैसे 43 लाख रुपये झाले असते.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.