Seamec च्या शेअर्समध्ये तेजी, काय आहेत कारणे? | Share Market News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Seamec Shares

Seamec च्या शेअर्समध्ये तेजी, काय आहेत कारणे?

Seamec Shares : शिपिंग कंपनी सीमेकच्या (Seamec) शेअर्समध्ये शुक्रवारी 17 टक्क्यांची वाढ झाली. एनएसईवर 15.67 टक्क्यांनी वाढून तो 794.55 रुपयांवर बंद झाला. तर, इंट्राडेमध्ये तो 810 रुपयांवर पोहोचला होता. गेल्या दोन दिवसांत त्याचे शेअर्स जवळपास 32 टक्क्यांनी वाढले आहेत.

कंपनीने पाइपलाइन रिप्लेसमेंट प्रोजेक्टमध्ये (PRPVII) तिच्या कंसोर्टियम पार्टनरसोबत सब काँट्रँक्ट ऍग्रीमेंट केला आहे. त्यामुळेच गुंतवणूकदार हे शेअर्स खरेदी करत आहेत. (Seamec shares increased read reasons share market news)

ऍग्रीमेंटअंतर्गत, कंपनी ओएनजीसीच्या सब-सी इंस्टॉलेशनशी संबंधित कामं युनिट दराच्या आधारावर करेल. या ऍग्रीमेंटचे अंदाजे एकूण मूल्य जीएसटी वगळून सुमारे 81 कोटी आहे. हे काम दोन वर्किंग सेशनमध्ये म्हणजेच मे 2024 पर्यंत पूर्ण केले जाईल.

सीमेक ही एचएएल ऑफशोर लिमिटेडची (HAL) सब्सिडियरी कंपनी आहे. एचएएल ही पाण्याखाली सेवा देणारी आघाडीची कंपनी आहे. ही कंपनी भारतीय ऑईल अँड गॅस इंडस्ट्रीला इपीसी सेवा देते.

सीमेकने गुंतवणूकदारांना कायमच चांगला परतावा दिला आहे. याच्या शेअर्सने अवघ्या 5 दिवसांत 35 टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. मात्र, गेल्या 6 महिन्यांत त्यात 28 टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांना 325.35% परतावा मिळाला आहे. तर, 23 वर्षात याने तब्बल 4,241.80% परतावा दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.