
Share Market : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील अॅक्शनमध्ये ?
Share Market : भारतीय बेंचमार्क इंडेक्स सोमवारी वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स-निफ्टी 5 महिन्यांच्या वरच्या पातळीवर बंद झाले. निफ्टी बँकेनेही रेकॉर्ड क्लोझिंग नोंदवली. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 317.81 अंकांनी अर्थात 0.51 टक्क्यांनी वाढून 62,345.71 वर आणि निफ्टी 84 अंकांनी म्हणजेच 0.46 टक्क्यांनी वाढून 18398.80 वर बंद झाला.
आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
निफ्टी अखेर 18350 च्या वर बंद होण्यात यशस्वी झाल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले. निफ्टी त्याच्या साईडवेज कंसोलिडेशनच्या रेंजच्या बाहेर येण्याचे संकेत देत आहे. या ब्रेकआऊटमुळे बाजाराचा कल बुल्सच्या बाजूने वळला आहे. अशा स्थितीत निफ्टीतील वाढ कायम राहण्याची अपेक्षा आहे. निफ्टी लवकरच 18500 च्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे. 18500 - 18520 निफ्टीसाठी रझिस्टंस दिसून येतो. दुसरीकडे, खाली 18190-18220 च्या झोनमध्ये सपोर्ट आहे. जोपर्यंत हा सपोर्ट आहे तोपर्यंत घसरणीदरम्यान खरेदी करण्याचा सल्ला गेडिया यांनी दिला आहे. (investment)
आजचे टॉप 10 अॅक्शन शेअर्स कोणते ?
हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)
टाटा मोटर्स (TATAMOTORS)
आयटीसी (ITC)
टेक महिन्द्रा (TECHM)
हिन्दाल्को (HINDALCO)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
बंधन बँक (BANDHANBNK)
अशोक लेलँड (ASHOKLEY)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)
ट्रेंट (TRENT)
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.