Share Market : 'या' हॉस्पिटलच्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल; तुमच्याकडे आहे का शेअर? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : 'या' हॉस्पिटलच्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल; तुमच्याकडे आहे का शेअर?

Share Market : अपोलो हॉस्पिटल्सचे (Apollo Hospitals) शेअर्स यावर्षी सुमारे एक टक्क्यांनी खाली आले आहेत, पण या शेअर्सने गुंतवणूकदारांना लाँग टर्ममध्ये चांगला परतावा दिला आहे.

पण यामध्ये आणखी कमाई करण्याची मोठी संधी असल्याचे शेअर मार्केट एक्सपर्ट्सने म्हटले आहे. सध्याच्या किमतीत गुंतवणूक करून यात सुमारे 30 टक्के नफा मिळू शकतो. त्याचे शेअर्स बीएसईवर 0.29 टक्क्यांनी घसरून 4402.95 रुपयांवर बंद झाले.

फार्मसी व्यवसायामुळे डिसेंबर 2022 च्या तिमाहीत अपोलो हॉस्पिटल्सचा महसूल वार्षिक 17.2 टक्क्यांनी वाढून 4,260 कोटी रुपये झाला. पण, अपोलो 24*7 वर जास्त खर्च केल्यामुळे एबिटदा मार्जिन तिमाही आधारावर 1.40 टक्क्यांनी घसरले.

देशांतर्गत ब्रोकरेज आयसीआयसीआय सिक्युरिटीजने यावर ऍड रेटिंग कायम ठेवले आहे. पण त्यांनी टारगेट 5,073 रुपयांवरुन 5052 रुपये केले आहे. आणखी एका ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने स्टॉकचे बाय रेटिंग कायम ठेवले आहे आणि 5,700 रुपयांचे टारगेट केले आहे.

9 नोव्हेंबर 2001 रोजी अपोलो हॉस्पिटलचे शेअर्स 36.42 वर होते. आता ते 4402.95 रुपयांवर आहे, म्हणजेच सुमारे 21 वर्षांत गुंतवणूकदारांची 83 हजार रुपयांची गुंतवणूक 121 पटीने वाढवून एक कोटी झाली आहे.

तर गेल्या वर्षी 14 मार्च 2022 रोजी, अपोलो हॉस्पिटलचे शेअर्स बीएसईवर 5015.45 रुपयांवर होते, जे एका वर्षातील विक्रमी उच्चांक आहे. पण नंतर, 26 मे 2022 रोजी ते 33 टक्क्यांनी घसरून 3365.90 रुपयांवर आले.

जे एका वर्षातील विक्रमी नीचांक आहे. पण मग घसरण थांबली आणि तो 31% रिकव्हर झाला. आता यामध्ये 30 टक्के वाढ होण्याचा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.