Share Market Closing: शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्समध्ये 200 अंकांची घसरण, बँकिंग शेअर्समध्ये...|Share Market closing latest updates today 1 June 2023 bse nse sensex nifty | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्समध्ये 200 अंकांची घसरण, बँकिंग शेअर्समध्ये...

Share Market Closing 1 June 2023: आज शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. BSE सेन्सेक्स 200 अंकांनी घसरून 62,428 वर बंद झाला. निफ्टी 48 अंकांनी वाढून 18,485 वर बंद झाला. बाजारातील घसरणीमध्ये बँकिंग शेअर्स आघाडीवर होते.

कोटक बँक 4.25 टक्क्यांनी घसरून बंद झाला. अपोलो हॉस्पिटल्सचा शेअर 4.5 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला. यापूर्वी, बुधवारी सलग 4 दिवसांच्या तेजीनंतर देशांतर्गत बाजार बंद झाले होते. BSE सेन्सेक्स 346 अंकांनी घसरून 62,622 वर बंद झाला.

आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 13 कंपन्यांचे नुकसान झाले, तर 17 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. भारती एअरटेल सर्वात जास्त 3.65 टक्क्यांनी घसरला. कोटक महिंद्रा बँकेचा शेअरही 3 टक्क्यांहून अधिक घसरला.

आयसीआयसीआय बँक आणि आयटीसीला प्रत्येकी 1 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. दुसरीकडे, टाटा मोटर्स, एशियन पेंट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि सन फार्मा या शेअर्समध्ये प्रत्येकी 1 टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

Share Market Closing 1 June 2023

Share Market Closing 1 June 2023

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 30,000 कोटींची वाढ:

आज BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 1 जून रोजी रु. 284.06 लाख कोटी झाले आहे, जे मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजेच बुधवार, 31 मे रोजी रु. 283.76 लाख कोटी होते.

अशाप्रकारे, बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 30 हजार कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 30,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

2,080 शेअर्समध्ये वाढ:

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) मध्ये आज मोठ्या प्रमाणात शेअर्स वाढीसह बंद झाले. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,661 शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 2,080 शेअर्स वाढीसह बंद झाले. त्याच वेळी 1,454 शेअर्समध्ये घसरण झाली. तर 127 शेअर्स कोणत्याही चढ-उताराशिवाय फ्लॅट बंद झाले.