Share Market Closing : शेअर बाजारात मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी पाण्यात, जाणून घ्या काय झाले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Closing : शेअर बाजारात मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी पाण्यात, जाणून घ्या काय झाले?

Share Market Closing : आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच सोमवारी शेअर बाजारात मोठी विक्री झाली. बाजारातील घसरणीचा हा सलग तिसरा दिवस होता. सेन्सेक्स 897 अंकांनी घसरून 58,237.85 वर बंद झाला.

त्याचप्रमाणे निफ्टीही 258 अंकांनी घसरून 17,154.30 वर बंद झाला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कारण BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 258.95 लाख कोटी रुपये झाले आहे. शुक्रवारी ते 262.94 लाख कोटी रुपये होते.

शेअर बाजारात मोठ्या घसरणीत ऑटो आणि बँकिंग शेअर्स आघाडीवर होते. निफ्टीमध्ये इंडसइंड बँकेचा शेअर 7% घसरून बंद झाला. SBI, TATA MOTORS, M&M 3% ने घसरले. तर टेक महिंद्रा 7% वर बंद झाला.

शेअर बाजारात घसरण का होत आहे?

  • कमकुवत जागतिक बाजार संकेतांचा बाजारावर दबाव

  • यूएस व्याजदर वाढण्याची अपेक्षा आहे

  • यूएस मध्ये SVB बँकेनंतर सिग्नेचर बँक दिवाळखोरी

  • RIL, TCS, ITC सारखे दिग्गज शेअर्स घसरले

  • डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला

आज बाजाराच्या घसरणीमध्ये कोणतेही क्षेत्र सुटू शकले नाही. बँक निफ्टी 920 अंकांनी घसरला आहे. स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्येही मोठी घसरण झाली आहे. याशिवाय ऑटो, आयटी, एफएमसीजी, मेटल, एनर्जी, मीडिया, कंझ्युमर ड्युरेबल्स सेक्टरचे शेअर्स घसरले.

BSE India

BSE India

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 29 शेअर्स घसरले आणि एक शेअर तेजीसह बंद झाला. निफ्टीच्या 50 शेअर्समध्ये 47 शेअर्सच्या घसरणीसह 3 शेअर्स तेजीसह बंद झाले आहेत.

अमेरिकेत दोन बँकां बंद :

विशेष म्हणजे एकामागून एक बँका बंद झाल्यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) बंद झाल्यानंतर, क्रिप्टो-फ्रेंडली म्हणून ओळखली जाणारी सिग्नेचर बँक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

या बँकेत क्रिप्टोकरन्सीचा साठा होता आणि त्याचा धोका लक्षात घेता न्यूयॉर्कची ही प्रादेशिक बँक काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (FDIC) ने सिग्नेचर बँक ताब्यात घेतली, ज्याची गेल्या वर्षाच्या अखेरीस 110.36 अब्ज डॉलर मालमत्ता होती, तर बँकेकडे 88.59 अब्ज डॉलर ठेवी होत्या.

अमेरिकेतील कोणत्याही आर्थिक हालचालींचा थेट परिणाम भारतीय बाजारांवर होतो. मग ते व्याजदरात वाढ असो किंवा फेड रिझर्व्हचे कोणतेही पाऊल असो. आता यूएस बँकिंग क्षेत्रातील संकटाचा नकारात्मक परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर दिसू आला आहे.