Share Market Closing : किंचित वाढीसह शेअर बाजार बंद; बँकांच्या 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Closing : किंचित वाढीसह शेअर बाजार बंद; बँकांच्या 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ

Share Market Closing : जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार गुरुवारी मोठ्या तेजीने उघडला. दिवसभर बाजारात तेजी कायम होती. पण बाजार बंद होण्यापूर्वीच गुंतवणूकदारांनी केलेल्या प्रॉफिट बुकींगमुळे बाजारात काही प्रमाणात तेजी कमी झाली आहे.

सेन्सेक्स त्याच्या उच्चांकावरून 360 अंकांनी खाली आला आणि निफ्टी उच्च स्थानावरून 100 अंकांनी खाली आला. आजच्या व्यवहाराअंती सेन्सेक्स 44 अंकांच्या किंचित वाढीसह 61,319 वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 20 अंकांच्या वाढीसह 18,035 वर बंद झाला.

BSE India

BSE India

बँकिंग आणि वित्तीय शेअर्स विक्री करण्यात आघाडीवर होते. तर आयटी आणि रियल्टी शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. याआधी भारतीय बाजारात काल म्हणजेच 15 फेब्रुवारीला निफ्टी 85 अंकांच्या वाढीसह 18,015 वर बंद झाला आणि सेन्सेक्स 242 अंकांच्या वाढीसह 61,275 वर बंद झाला.

आजच्या ट्रेडिंग सत्रात जिथे बँकिंग, ऑटो, एफएमसीजी, कंझ्युमर ड्युरेबल्स सेक्टरच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

हेही वाचा : वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...

आयटी, ऑइल अँड गॅस, हेल्थकेअर, इन्फ्रा, एनर्जी, मेटल सेक्टरमध्ये तेजी आली. निफ्टीचा आयटी निर्देशांक 1.62 टक्के किंवा 500 अंकांच्या वाढीसह 31,434 अंकांवर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागातही तेजी दिसून आली. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 14 समभाग वाढीसह बंद झाले तर 16 तोट्यासह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 पैकी 27 समभाग वधारले आणि 23 घसरले.