
Share Market Closing: तेजीसह शेअर बाजार बंद; सेन्सेक्समध्ये 150 अंकांची वाढ, मिड कॅप स्टॉकमध्ये...
Share Market Closing 25 May 2023: भारतीय शेअर बाजारासाठी गुरुवारचा दिवस चांगला ठरला आहे. एफएमसीजी आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील स्टॉकमध्ये खरेदीमुळे बाजार तेजीसह बंद झाला.
आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 150 अंकांच्या तेजीसह 61,872 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 36 अंकांच्या तेजीसह 18,321 अंकांवर बंद झाला.

Share Market Closing 25 May 2023
रियल्टी-एफएमसीजी स्टॉक्समध्ये तेजी:
एनएसईवरील एफएमसीजी निर्देशांक एक चतुर्थांश टक्क्यांनी वाढून बंद झाला. रिअॅल्टी निर्देशांकात 1.25 टक्क्यांची तेजी नोंदवली गेली. बजाज ऑटो आणि भारती एअरटेल निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. तर विप्रोचा शेअर टॉप लूझर ठरला.
याआधी बुधवारी भारतीय बाजार घसरणीसह बंद झाले होते. BSE सेन्सेक्स 208 अंकांनी घसरून 61,773 वर आणि निफ्टी 62 अंकांनी घसरून 18,285 वर बंद झाला.
आजच्या व्यवहारात एफएमसीजी शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. निफ्टी एफएमसीजी 0.61 टक्के किंवा 302 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय कंज्यूमर क्षेत्रातील शेअर्समध्येही तेजी दिसून आली.
आयटी, ऑटो, फार्मा, बँकिंग, मेटल, इन्फ्रा क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले. तर तेल आणि वायू, आरोग्यसेवा, कमोडिटी, ऊर्जा क्षेत्रातील शेअर्स घसरले.
मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही तेजी दिसून आली. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 28 शेअर्स वाढीसह आणि 22 शेअर्स घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 15 शेअर्स वाढीसह तर 15 शेअर्स घसरणीसह बंद झाले.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ:
BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज, 25 मे रोजी रु. 280.53 लाख कोटी इतके वाढले आहे, जे 24 मे, बुधवार, 279.48 लाख कोटी होते.
अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.03 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.03 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.