Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; आज 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ

बीएसई सेन्सेक्स 346 अंकांच्या उसळीसह 57,960 वर बंद झाला
Share Market
Share MarketSakal

Share Market Closing 29th March 2023: बुधवारी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. बँकिंग, आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे बाजारात ही तेजी दिसून आली आहे.

आजच्या व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स 346 अंकांच्या उसळीसह 57,960 वर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 129 अंकांच्या वाढीसह 17,000 अंकांच्या वाढीसह 17,080 अंकांवर बंद झाला.

आजच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग, आयटी, ऑटो, एफएमसीजी, धातू, मीडिया, हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल्स अशा सर्वच क्षेत्रांत खरेदी दिसून आली. केवळ तेल आणि वायू हे क्षेत्र असे आहे की ज्यांच्या स्टॉकमध्ये थोडीशी घसरण झाली आहे.

बँकिंग, मेटल आणि आयटी शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. NSE वर निफ्टी PSU निर्देशांक 3.2 टक्क्यांनी वाढून बंद झाला, तर धातू निर्देशांक 2.4 टक्क्यांनी वधारला. त्याचप्रमाणे आयटी आणि ऑटो निर्देशांकानेही 1-1 टक्क्यांच्या मजबूतीसह बंद केले.

सकाळची सुरुवात काहीशा जोराने बाजारात झाली, मात्र वरच्या स्तरावरून झालेल्या विक्रीमुळे बाजारत घसरण झाली. दिवसभरात सेन्सेक्स 57,524 वर घसरला. याआधी मंगळवारी वरच्या पातळीवरून मोठ्या घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात दबाव होता.

सरतेशेवटी, सेन्सेक्स 40 अंकांनी घसरून 57,613 वर बंद झाला आणि निफ्टीही 34 अंकांनी घसरून 16,951 वर बंद झाला.

BSE India
BSE IndiaSakal

शेअर बाजारातील तेजीची कारणे :

  • युरोपियन बाजारांसाठी जोरदार सुरुवात

  • जगभरातील शेअर बाजारात तेजी

  • डॉलर निर्देशांक स्थिर, 102.5 च्या जवळ

  • HCL TECH, SBI, MARUTI सारख्या शेअर्समध्ये वाढ

Share Market
UPI Payment Charges : 1 एप्रिलपासून UPI ​​पेमेंट महाग होईल का? NPCI ने दिले स्पष्टीकरण

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ :

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज, 29 मार्च, 255.06 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, जे मंगळवारी, 28 मार्च रोजी 251.94 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 3.12 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 3.12 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Share Market
जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com