Share Market Closing: चार दिवसांच्या तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 400 अंकांनी घसरला, बँकिंग शेअर्समध्ये...|Share Market closing latest updates today 31 May 2023 bse nse sensex nifty | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market latest updates today

Share Market Closing: चार दिवसांच्या तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 400 अंकांनी घसरला, बँकिंग शेअर्समध्ये

Share Market Closing 31 May 2023: बुधवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. BSE सेन्सेक्स 346 अंकांनी घसरून 62,622 वर बंद झाला. निफ्टीही 99 अंकांनी घसरला आणि 18,534 वर बंद झाला. आज 4 दिवसांनंतर बाजारात घसरण नोंदवली गेली.

बँकिंग शेअर्समध्ये घसरण:

बँकिंग क्षेत्रातील शेअर्स घसरणीत आघाडीवर होते. अॅक्सिस बँकेचा शेअर 2 टक्क्यांनी घसरला. तर Tech Mah चा शेअर 2% च्या निर्देशांकात तेजीसह व्यवहार करत होता.

याआधी मंगळवारी भारतीय बाजाराने सलग चौथ्या दिवशी तेजी नोंदवली. BSE सेन्सेक्स 122 अंकांनी घसरून 62,969 वर बंद झाला.

शेअर बाजारातील घसरणीची कारणे:

  • जगभरातील शेअर बाजारात विक्री

  • डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण

  • हेवीवेट शेअर्समध्ये मोठी घसरण

  • मंदीच्या भीतीने बाजारात दबाव

Share Market Closing 31 May 2023

Share Market Closing 31 May 2023

आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 19 कंपन्यांचे नुकसान झाले, तर 11 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. अॅक्सिस बँकेत सर्वाधिक अडीच टक्क्यांची घसरण झाली. एनटीपीसी, एसबीआय आणि रिलायन्सच्या सशेअर्सनाही 2-2 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

बीएसई सेन्सेक्सवर अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.41 टक्क्यांची घसरण झाली. त्याचप्रमाणे एसबीआय आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

त्याचप्रमाणे एचडीएफसी, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह एक टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती, आयटीसी, पॉवरग्रीड, टीसीएस, बजाज फायनान्स आणि इन्फोसिसचे शेअर्सही घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर या शेअर्समध्ये तेजी:

BSE सेन्सेक्सवर भारती एअरटेलचा शेअर्स सर्वाधिक 4.78 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. टेक महिंद्रा 2.08 टक्के, एशियन पेंट्स 1.67 टक्के, सन फार्मा 1.60 टक्के, टाटा मोटर्स 1.47 टक्के, कोटक महिंद्रा बँक 1.07 टक्के आणि नेस्ले इंडिया 0.92 टक्के वाढले. त्याच वेळी, एचसीएल टेक, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि विप्रोचे शेअर्स देखील तेजीसह बंद झाले.