Share Market Closing: शेअर बाजारात तेजीसह बंद; सेन्सेक्समध्ये 240 अंकांची वाढ, बँकिंग शेअर्समध्ये...|Share Market closing latest updates today 5 June 2023 bse nse sensex nifty | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात तेजीसह बंद; सेन्सेक्समध्ये 240 अंकांची वाढ, बँकिंग शेअर्समध्ये...

Share Market Closing 5 June 2023: शेअर बाजारात व्यावसायिक सप्ताहाच्या पहिल्या दिवशी तेजी दिसून आली. चांगल्या जागतिक संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक तेजीसह बंद झाले. BSE सेन्सेक्स 240 अंकांनी वाढून 62,787 वर बंद झाला.

त्याचप्रमाणे निफ्टीही 60 अंकांच्या वाढीसह 18,593 वर बंद झाला. बाजारातील तेजीत ऑटो शेअर्स आघाडीवर होते.

NSE वर निफ्टी ऑटो इंडेक्स 1.25 टक्क्यांनी वाढला. M&Mचा शेअर निफ्टीमध्ये 4 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला, जो निर्देशांकातही सर्वाधिक वाढणारा आहे.

दुसरीकडे, डिव्हिस लॅब आणि एशियन पेंट्सचे शेअर्स 1.25 टक्क्यांच्या घसरणीसह निर्देशांकात सर्वाधिक घसरले.

Share Market Closing 5 June 2023

Share Market Closing 5 June 2023

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर्स सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 3.81 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. अॅक्सिस बँक 2.68 टक्के, टाटा मोटर्स 2 टक्के, लार्सन अँड टुब्रो 1.53 टक्के, टाटा स्टील 1.25 टक्के आणि आयसीआयसीआय बँकेचा शेअर 1.14 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

सेन्सेक्समध्ये एशियन पेंट्सने सर्वाधिक 1.09 टक्क्यांची घसरण नोंदवली. त्याचप्रमाणे टेक महिंद्रामध्ये 1.02 टक्के, नेस्ले इंडियामध्ये 0.82 टक्के, एचयूएलमध्ये 0.68 टक्के, आयटीसीमध्ये 0.47 टक्के, टीसीएसमध्ये 0.45 टक्के, भारती एअरटेल 0.38 टक्के, टायटन 0.16 टक्के हे शेअर्स घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती:

आजच्या व्यवहारादरम्यान क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती पाहिली, तर ऑटो आणि कॅपिटल गुड्स निर्देशांकात एक टक्क्याची तेजी होती. त्याच वेळी, आयटी आणि एफएमसीजी क्षेत्रात काही प्रमाणात विक्री झाली. बीएसई मिडकॅप निर्देशांकात 0.3 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांकात 0.5 टक्क्यांची वाढ दिसून आली.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ:

शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. आज, बाजार बंद होताना, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 286.06 लाख कोटी रुपये आहे, तर 2 जून रोजी मार्केट कॅप 285.30 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 76,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.