Share Market Closing: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स 62,750 वर, बँकिंग शेअर्सचे काय झाले?

निफ्टीही 15 अंकांच्या घसरणीसह 18,600 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.
Share Market latest updates today
Share Market latest updates today Sakal

Share Market Closing 9 June 2023: शुक्रवारी शेअर बाजार तेजीसह उघडला. परंतु आयटी, एफएमसीजी आणि पीएसयू बँकिंग शेअर्स मोठ्या घसरणीमुळे शेअर बाजारात घसरण झाली.

BSE सेन्सेक्स जवळपास 100 अंकांच्या घसरणीसह 62,750 पर्यंत खाली घसरला आहे. त्याचप्रमाणे निफ्टीही 15 अंकांच्या घसरणीसह 18,600 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

आयटी, एफएमसीजी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर बाजारातील घसरणीमध्ये आघाडीवर आहेत. निफ्टीमध्ये इंडसइंड बँकेचा शेअर सर्वाधिक वाढला आहे. तर HUL चा शेअर सर्वाधिक घसरला आहे.

Share Market Closing 9 June 2023
Share Market Closing 9 June 2023Sakal

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

टाटा स्टील, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, एसबीआय, एचसीएल टेक, इन्फोसिस, टेक महिंद्रा, आयटीसी, एशियन पेंट्स , टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो, नेस्ले इंडिया, सन फार्मा, भारती एअरटेल शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market latest updates today
Who is Pratik Doshi: देशाच्या अर्थमंत्र्यांच्या जावयाचे आहे गुजरात कनेक्शन; PM मोदींसोबत आहे...

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

इंडसइंड बँकेचा शेअर सेन्सेक्सवर सर्वाधिक वाढीसह बंद झाला. त्याचप्रमाणे अॅक्सिस बँक, पॉवरग्रीड, लार्सन अँड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स आणि एनटीपीसी यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले.

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले की, देशांतर्गत शेअर बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला कारण गुंतवणूकदार देशांतर्गत महागाई वाढीच्या आकडेवारीची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Share Market latest updates today
Shivrajyabhishek Sohala : हिंदवी स्वराज्याची स्थापना केवळ राजकीय सत्तेसाठी केली नव्हती, हा तर भारतीयत्वाचा अरुणोदय

गुंतवणूकदारांचे 75 हजार कोटी बुडाले:

BSE वर सूचीबद्ध केलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज, 9 जून रोजी रु. 286.70 लाख कोटींवर घसरले आहे, जे त्यांच्या मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजेच गुरुवार, 8 जून रोजी रु. 287.45 लाख कोटी होते.

अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 75 हजार कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 75 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com