Share Market : पिडिलाईट इंडस्ट्रीज (शुक्रवारचा बंद भाव : रु. २,३१८)

चिकटविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांमध्ये फेव्हिकॉल या लोकप्रिय उत्पादनाचा हिस्सा ७० टक्के आहे.
share market investment Pidilite Industries Limited finance money
share market investment Pidilite Industries Limited finance money sakal
Summary

चिकटविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांमध्ये फेव्हिकॉल या लोकप्रिय उत्पादनाचा हिस्सा ७० टक्के आहे.

- भूषण विश्‍वनाथ गोडबोले

पिडिलाईट इंडस्ट्रीज या कंपनीमार्फत फेव्हिकॉल, डॉक्टर फिक्सिट, एमसील, फेव्हिक्विक, रोफ, अराल्डाइट आदी अनेक लोकप्रिय उत्पादनांची निर्मिती होते. चिकटविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांमध्ये फेव्हिकॉल या लोकप्रिय उत्पादनाचा हिस्सा ७० टक्के आहे.

share market investment Pidilite Industries Limited finance money
Tax Recovery : पूर्व विभागाकडून सुटीच्या कारवाईत 5 लाखांची वसुली

कंपनी तिच्या एकूण उत्पन्नापैकी ६५ टक्के महसूल, सुधारणा आणि देखभाल विभागातील उत्पादनांद्वारे, तर उर्वरित महसूल बांधकाम वॉटर प्रूफिंग, टाइल अॅडेसिव्ह आदी नव्या उत्पादन श्रेणींमधून प्राप्त करत आहे. टाइल अॅडेसिव्ह सेगमेंट ही कंपनीसाठी वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे.

तिमाही निकालानुसार, कंपनीला ३०८ कोटी रुपये निव्वळ नफा मिळाला आहे, तर मागील तीन तिमाही निकालानुसार एकूण निव्वळ नफा १,००४ कोटी रुपयांवर गेला आहे. निकालानंतर कंपनीने दीर्घावधीमध्ये दुहेरी अंकातील वाढीचा पुनरुच्चार केला आहे.

share market investment Pidilite Industries Limited finance money
SBI Gold Bond : गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी! SBI मध्ये स्वस्तात खरेदी करू शकता सोने; काय आहे योजना

कंपनी व्यवस्थापनानुसार डिसेंबर २०२२ पासून महागाईचा दबाव कमी होत असून, ग्रामीण भागातून बांधकाम क्रियेतील वाढीमुळे कंपनीच्या उत्पादनांच्या मागणीत वाढ होत आहे. विकसनशील शहरांमधील रिअल इस्टेट उद्योगातील अपेक्षित तेजीमुळे कंपनीला उत्पादनांच्या मागणीत वाढ होणे अपेक्षित आहे.

कंपनीच्या उत्पादन विक्रीला गती देण्यासाठी ‘पिडिलाईट की दुनिया’ या अंतर्गत वितरण जाळ्यात कंपनीने २१०० नवी गावे जोडली आहेत. आतापर्यंत कंपनीने ग्रामीण भागामध्ये सुमारे ७०० गावांमध्ये वितरण जाळ्याचा विस्तार केला आहे. ‘विनाइल ॲसीटेट मोनोमर’ हे एकूण कच्च्या मालाच्या खर्चात साधारण २५ टक्के योगदान देते.

share market investment Pidilite Industries Limited finance money
Foxconn Investment In India: महाराष्ट्रातून गेलेली कंपनी कर्नाटकात करणार ६,००० कोटींची गुंतवणूक

सध्या याच्या किमती कमी झाल्याने कंपनीला आगामी काळात याचा फायदा मिळणे अपेक्षित आहे. व्यवसायवृद्धीसाठी पुढील १८ महिन्यांत सर्व विभागांमध्ये नवी उत्पादने दाखल करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. कर्ज आणि भांडवलाचा विचार करता ही कंपनी जवळजवळ कर्जमुक्त आहे.

गेल्या १० वर्षांचा विचार करता कंपनी धंद्यात गुंतविलेल्या भांडवलावर सातत्याने दरवर्षी २० टक्क्यापेक्षा जास्त परतावा मिळवत आहे. यशस्वीरित्या नफ्याची धंद्यात पुनर्गुंतवणूक करून कंपनी व्यवसायवृद्धी करत आहे. शेअर बाजारातील चढउतार आणि कंपनीच्या कार्यक्षेत्रातील धोका लक्षात घेऊन ‘पिडिलाईट इंडस्ट्रीज’ या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घावधीच्या दृष्टीने गुंतवणूक करण्याचा जरूर विचार करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com