Share Market : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये? जाणून घ्या

Share Market Investment Tips : सेन्सेक्स, निफ्टी सलग आठव्या दिवशी घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 326 अंकांनी घसरून 58962 वर बंद झाला तर निफ्टी 89 अंकांनी घसरून 17304 वर बंद झाला.

मंगळवारी सर्वाधिक विक्री फार्मा, एनर्जी, मेटल आणि आयटी शेअर्समध्ये झाली. इन्फ्रा, एफएमसीजी शेअर्सवरही दबाव दिसून आला. मंगळवारी बँकिंग शेअर्समध्ये विक्री झाली.

निफ्टी बँक 38 अंकांनी घसरून 40,269 वर बंद झाला. त्याचबरोबर रियल्टी आणि मीडिया शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बाजार सलग आठव्या दिवशी घसरणीवर बंद झाल्याचे शेअर खानचे जतीन गेडिया म्हणाले. डेली लोअर बोलिंजर बँड विस्तारत आहे आणि निफ्टी या बँडच्या खालच्या टोकाला व्यवहार करत आहे.

यावरून निफ्टी आणखी खाली येण्याची शक्यता आहे. आवर्ली चार्टवर, 20 आवर मूव्हिंग एव्हरेज (17383) रझिस्टंस म्हणून काम करत आहे.

निफ्टी 200 दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजच्या खाली (17384) बंद झाला. हे देखील एक नकारात्मक चिन्ह आहे. पण आवर्ली मोमेंटम इंडिकेटर पॉझिटीव्ह क्रॉसओव्हरसह पॉझिटीव्ह डायव्हर्जन दाखवत आहे.

त्यामुळे बाजारात तेजी येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत बाजारात पुन्हा पूलबॅक आला तरी ती केवळ रिलीफ रॅली असेल. यामुळे बाजाराचा कल बदलणार नाही.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • सिप्ला (CIPLA)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • डॉ. रेड्डी (DRREDDY)

  • ओएनजीसी (ONGC)

  • रिलायन्स (RELIANCE)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • ट्रेंट (TRENT)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.