Share Market : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये? जाणून घ्या

Share Market Investment Tips : सलग 8 दिवसांच्या घसरणीला बुधवारी अखेर ब्रेक लागला. सेन्सेक्स 449 अंकांनी वाढून 59 हजार 411 वर बंद झाला. तर निफ्टी 147 अंकांनी वाढून 17,451 वर बंद झाला.

बुधवारी सर्वाधिक खरेदी मेटल, बँकिंग, आयटी शेअर्समध्ये दिसून आली. त्याचबरोबर रियल्टी, पीएसई, ऑटो शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

तर एनर्जी, इन्फ्रा, एफएमसीजी इंडेक्स वाढीसह बंद झाले. निफ्टी बँक 429 अंकांनी वाढून 40,698 वर बंद झाला. मिडकॅप इंडेक्स 467 अंकांनी वाढून 30,584 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

सततच्या घसरणीनंतर बाजाराला बुधवारी दिलासा मिळाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले.

युरोपियन आणि निवडक आशियाई इंडेक्समध्ये शॉर्ट कव्हरिंग आणि तेजीमुळे मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. निफ्टीमध्ये ही रिकव्हरी अपेक्षित होती, कारण कमकुवत जागतिक संकेत आणि मंदीच्या चिंतेमुळे गेल्या एका आठवड्यात बाजारात सतत विक्री होत होती.

निफ्टीमध्ये एक आशादायक रिव्हर्सल फॉर्मेशन आणि मजबूत बुलिश कँडल येत्या काळात आणखी तेजीचे संकेत देत आहे.

17,350 ची पातळी ट्रेडर्ससाठी एक महत्त्वाचा सपोर्ट झोन म्हणून काम करेल. या वर पॉझिटिव्ह मोमेंटम 17,525-17,600 पर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, निफ्टीचा अपट्रेंड 17,350 च्या खाली घसरल्यास तो कमजोर होईल.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • झिंदाल स्टील (JINDALSTEL)

  • ए यू बँक (AUBANK)

  • एबीबी इंडिया लिमिटेड (ABB)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • एल अँड टी सर्व्हिसेस (LTTS)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.